संख,वार्ताहर: पांडोझरी ता.जत येथे जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांच्या स्वीय फंड निधीतून दोन हायमास्ट विज पोल बसविण्यात आले.यामुळे पांडोझरीत रात्रीही दिवसाप्रमाणे उजळलेले आहे.या हायमास्टचे उद्घाटन माजी संरपच मुऱ्याप्पा कांबळे व उपसंरपच नामदेव पुजारी यांच्या हस्ते झाले. यावेळी साहेबलाल मुल्ला,दादासो मुल्ला,ग्रामसेवक श्री.पोतदार उपस्थित होते. गावातील मागासवर्गीय वस्ती,व लक्ष्मी मंदिर चौकात हे हायमास्ट बसविण्यात आले आहेत.
यावेळी बोलताना उपसंरपच नामदेव पुजारी म्हणाले,ग्रामस्थांनी आमच्यावर दाखविलेला विश्वास विकासकामातून आम्ही सार्थकी लावत आहोत.गावात अनेक विकास कामे होत आहे. सर्वच पातळीवर निवडणूकीपुर्वी आश्वासनाची आम्ही पुर्तता करत आहोत.रात्रीच्या वेळीचा अंधारा दूर करून ग्रामस्थांना सुरक्षितता दूर करण्यासाठी आम्ही जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांच्याकडे हायमास्ट विज पोलची मागणी केली होती.त्यांनी ती मागणी मान्य करत गावाला दोन अत्याधुनिक विज बल्प असलेले हायमास्ट पोल दिले आहेत. त्यामुळे पांडोझरी उजेडाने उजळलेले आहे. भविष्यात चोऱ्या,जंगली प्राण्यापासून ग्रामस्थांची सुटका होणार आहे.
पाडोंझरी ता.जत येथील हायमास्ट विद्युत पोलचे उद्घाटन करताना माजी संरपच मुऱ्याप्पा कांबळे,उपसंरपच नामदेव पुजारी व मान्यवर