जत,प्रतिनिधी: सीएम चषक भव्य मँरेथान स्पर्धेत भल्या पहाटे गुलांबी थंडीत जत धावले.तब्बल हाजारवर स्पर्धतातून उत्साह ओसांडून वाहत होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून विविध क्रिडा स्पर्धेतून ग्रामीण भागातील खेळांडूना वाव मिळावा म्हणून अनेक खेळांच्या सीए चषक स्पर्धा आयोजित केल्या आहे.जत तालुक्यातील स्पर्धेचे नियोजन भाजपचे राज्यकार्यकारणी सदस्य डॉ.रविंद्र आरळी यांच्याकडे आहे.यापुर्वी कुस्तीसह अन्य स्पर्धेचे नेटके नियोजन डॉ.आरळीज् टीमकडून करण्यात आले. सदृढ प्रकृत्तीसाठी गरजेचे असणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धा शनिवारू सकाळी सात वाजता उत्साहात संपन्न झाल्या.डॉ.आरळी यांनी झेंडा दाखवून स्पर्धेस सुरूवात केली.मुख्यमंत्री फडणवीस यांचे फोटो असलेले पांढरे टी शर्ट घातलेले स्पर्धेक जतकरांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
सीएम चषक मॅरेथान स्पर्धेचे उद्घाटन करताना डॉ.रविंद्र आरळी व मान्यवर