बेरोजगारीने तरूण गुन्हेगारीच्या विळाख्यात, जत तालुक्यातील विदारक चित्र : उच्च शिक्षित,अल्पवयीन मुलेही बरबादीकडे

0

जत,प्रतिनिधी:जत तालुक्यात बेरोजगारी, दारिद्य्र, कुशलतेचा अभाव अशा समस्या एका बाजूला आहेतच. त्याचवेळी शेती आहे;  पण कोणी मुलगी देत नाही; अशा कात्रीत शेकडो तरुण सापडले आहेत. यातीलच काही वाट हरविलेली तरुणाई ‘युज अ‍ॅण्ड थ्रो’साठी राजकारण्यांच्या दावणीला तर काहीजण व्यसनाधीनता आणि गुन्हेगारीच्या विळख्यात सापडत आहेत. सध्या तरुणवर्गातील बेरोजगारीची समस्या गंभीर बनत चालली आहे.सीमावर्ती भाग,दुष्काळ पाचवीला पुजलेला जमीन मोठी असूनही दोन वेळच्या जेवनाची भ्रांत येथील कुंटुबाची झाली आहे. सततच्या दुष्काळाने व शैक्षणिक जागृत्तीने तरूण पिठी उच्च शिक्षित होत आहे. अशा कुटुंबातील शिकल्या – सवरलेल्या कुटुंबांमध्ये ‘ना धड शेतीचा आधार ना नोकरी’ अशा कात्रीत इथला तरुणवर्ग मोठ्या संख्येने सापडला आहे.‘रिकामं मन अन् सैतानाचं घर’ असे म्हटले जाते. हाताला काम नसले की नसते उद्योग सुचतात आणि मारामार्‍या – व्यसनाधीनता यातून वाढलेली गुन्हेगारी या परिसरात पहायला मिळत आहे. या गुन्हेगारीच्या पाठीमागे जी अनेक कारणे वर्षांनुवर्षे सांगितली जातात त्यामध्ये पैसा-संपत्ती हे प्रमुख कारण आहे. 

सांगली जिल्ह्यात मोठे कार्यक्षेत्र असणार्‍या जत तालुक्यात दरवर्षी सुमारे हाजारावर विद्यार्थी विविध प्रकारच्या पदव्या (बी.ए., बी.कॉम. ते बी.एड्., बी.बी.ए., बी.सी.ए.) घेऊन बाहेर पडतात. आतापर्यत 20 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्याचे स्पष्ट झाले. बोटावर मोजता येतील एवढ्या जणांनादेखील सर्व प्रकारच्या क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळत नाहीत, हे विदारक वास्तव आहे.स्थानिक नेतेही येथील बेरोजगारी हटवी म्हणून प्रयत्न करत नाहीत.परिणामी राजकीय प्रेरीत गुन्हेगारी बोकाळली आहे.अगदी अल्पवयीन तरूणही धारदारी तलवारी,रिव्हालवर बाळगतानाचे चित्र भविष्य गंभीर मोडवर दर्शवते.

बहुसंख्य युवकांनी कला – वाणिज्य – विज्ञानसारख्या पारंपरिक पदव्यादेखील रडत – खडत का होईना पण घेतल्या आहेत. परंतु हाताला काम नाही, अशी स्थिती आहे. काहींना शेती आहे, पण शेतकरी म्हणून कोणी मुलगी देत नाही. मुलांचे लग्‍नाचे वय उलटत गेले तरी त्यांचे लग्‍न ठरत नाहीत. पूर्वी ग्रामीण भागामध्ये 20-22-25 वयापर्यंत मुलांचे विवाह केले जायचे. पुढे उच्च शिक्षण-नोकरी मिळण्यासाठीचा व आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर होण्याचा कालावधी विचारात घेता 26-29 अशा वयापर्यंत विवाह लांबू लागले होते.

Rate Card

मुलगी ही शिक्षित-उच्चशिक्षित असो वा नसो, पण अशा विवाह इच्छुक मुलींनी नोकरीच्याच मुलांना पसंती दिली आहे.

इथल्या तरुणाईचा अन् त्यांच्या पालकांच्या चिंतेचा प्रश्‍न खूपच गंभीर बनत चालला आहे. त्यातच विवाहाविना ही तरुणाई कोणत्या वळणावर भरकटत जाईल; ही तर सामाजिकदृष्ट्या एक ज्वलंत समस्या म्हणून पुढे येत आहे. ‘ज्याचं जळतं त्याला कळतं’  असे म्हणतात. या म्हणीनुसार या तरुणाईची अन् त्यांच्या पालकांची चिंता मात्र वाढू लागल्याचे विदारक वास्तव पुढे येत आहे!

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.