माडग्याळ | पाण्याच्या टँकरसाठी दरीबडचीकरांचा 3 डिसेंबरला गाव बंद,मोर्चा |

0

माडग्याळ,वार्ताहर : दरीबडची(ता.जत)येथे तीव्र पाणी टंचाईमुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.गावात व वाडीवस्तीवर पाणी टंचाई असल्याने ग्रामपंचायतीने टँकर मागणीचा प्रस्ताव तहसिलदार कार्यालयास देऊनही अद्याप टँकर देण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.टँकर न मिळाल्यास 3 डिसेंबरला गाव बंद करून ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर घागरी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.तसे निवेदन आमदार,उपविभागीय पोलीस अधिकारी जत,प्रांताधिकारी,गटविकास अधिकारी,  जत तहसीलदार कार्यालय जत,पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहे.जत पूर्व भागातील दरीबडचीमध्ये गेली तीन महिने झाले पाणीटंचाई निर्माण झाली आहे.ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा करणारी विहीर सिद्धनाथ तलावजवळ आहे.तलावच कोरडा पडल्याने विहिरीचे पाणी स्ञोत आटले आहेत.त्यामुळे तीन महिने झाले गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.गावभागासह मानेवस्ती,चव्हाणवस्ती, मासाळवस्ती,माळीवस्ती,मोरडीवस्ती,जाधववस्ती  वाडीवस्तीवर पाणीटंचाई असल्यामुळे ग्रामपंचायतीने तहसिलदार कार्यालयास ता. 5 सप्टेंबरला टँकर  मागणीचा प्रस्ताव देण्यात आला होता.परंतु महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे गावात पाणी विकत घेण्याची वेळ ग्रामस्थांच्यावर आली आहे.अद्याप महसूल विभागाने टँकर न दिल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.दरीबडचीमध्ये गेल्या वर्षभरात समाधानकारक पाऊस झाल्या नसल्याने विहिरी,तलाव व कुपनलिका कोरडे पडले आहेत.पाणी नसल्यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, मका,हरभरा पिकांना पाणी नसल्याने पिके वाळली आहेत.जनावरांना खाण्यास चारा नाही.पिण्यास पाणी नाही,त्यामुळे शेतकरी जनावरे बाजारात नेऊन विकत आहेत.परिसरात दुष्काळाची झळ वाढतच चालली आहे. पाणी टंचाईमुळे डाळिंब बागा वाळल्या आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.