डफळापूर | मराठा आरक्षण निर्णयाचे स्वागत : सुभाषराव गायकवाड |

0
6


डफळापूर, वार्ताहर: शासनाने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयकास गुरुवारी विधिमंडळात एकमताने मंजुरी देण्यात आली.मराठा समाजाने उभारलेल्या अंदोलनाच्या लढ्याला यश आले आहे. जत तालुक्यातील सर्व समाजातील जनतेने दिलेला पाठिंब्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळाला आहे. त्याचे आम्ही स्वागत करत आहोत.असे मत मराठा स्वराज्य संघाचे जिल्हाध़्यक्ष सुभाषराव गायकवाड व्यक्त यांनी केले. यापुढे न्यायालयातही हे आरक्षण टिकावे यासाठी आमचा लढा कायम राहिल.
डफळापूर येथे मराठा समाजाला मिळालेला आरक्षणाचे स्वागत करण्यात आले.डफळापूरसह तालुक्यात अंदोलनाची सुरूवात करणारे मराठा स्वराज्य संघ, मराठा सेवा संघासह विविध संघटनानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष बाजीराव चव्हाण, रमेश शिंदे,वंसत चव्हाण,दाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here