आसंगी ; विकासनिधी हडपला दलित वस्ती सुधार योजनेची कामे रोहयोत दाखवून निधी खर्च दाखविला : अंदोलनचा इशारा
माडग्याळ,वार्ताहर:आसंगी (ता.जत)येथील दलितवस्ती सुधार योजनेची रक्कम बोगस खर्च दाखवून हडप केल्याची तक्रार आसंगीचे माजी सरपंच बिरुदेव बाबर यांनी जि.पचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.यांची खातेनिहान चौकशी करून संबधितावर कारवाई करावी अशी मागणी बाबर यांची आहे.यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की,आसंगीमध्ये सन 2016-17 मध्ये येथे दलित व मातंग समाजासाठी दहा लाख रुपये रस्ते, लाईट व गटारासाठी मंजूर करण्यात आले होते.पण ते पैसे त्या कामासाठी न खर्च करता काही पदाधिकाऱ्यांकडून ती कामे रोजगार हमी योजना मधुन केलेली दाखविण्यात आले आहे. पंचायत समितीकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरत मंजूर दहा लाख रुपयापैंकी फक्त दीड लाख रुपये प्रत्यक्षात खर्च केले आहेत.ती कामे त्या योजनेतील इस्टेमेटप्रमाणे केलेली नाहीत.त्यासाठी संबधित ठेकेदार, सरपंच, ग्रामसेवक यांनी संगमनत करून शासनाचा पुर्ण निधी हडप केलेला आहे.
केलेल्या सर्व कामाची चौकशी करून संबधित दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी.अन्यथा मागासवर्गीय समाजाच्या वतीने ग्रामपंचायतीस टाळे ठोकण्याचा इशारा माजी सरपंच बिरुदेव बाबर यांनी दिला आहे.
