डफळापूर, वार्ताहर: म्हैसाळ योजनेच्या बिंळूर कालव्यात अखेर सोमवारी पाणी सोडले.गेल्या महिन्यापासून कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणीपट्टीची रक्कम भरली होती.मात्र पिके वाळत असतानाही पाणी सोडण्यास विलंब होत होता.शेतकऱ्यांनी आक्रमकता दाखवत अंदोलनाचा इशारा दिला होता.याबाबतचे म्हैसाळ बिंळूर कालवा कोरडा या मथळ्याखाली दैं.संकेत टाइम्समध्ये आवाज उठविण्यात आला होता.अखेर यांची दखल घेत म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांना बिंळूर कालव्यात पाणी सोडले.
या पाण्यामुळे डोर्ली,अंकले,बाज,बेंळूखी गावातील शेतीला काहीप्रमाणात फायदा होणार आहे.द्राक्षे,ज्वारी पिंकाना या पाण्याचा फायदा होईल.दरम्यान डफळापूर गावालगतच्या तलावात पाणी सोडण्याचे नियोजन अधिकाऱ्यांचे आहे.मात्र विवेकानंद स्कूल जवळ शेतकऱ्यांनी कालव्याचे काम अडविल्याने सध्या पाणी सोडणे शक्य नसल्याचे एका अधिकाऱ्यांने सांगितले.दरम्यान शेतकऱ्यांचा वाद न मिटल्यास या पाण्यासाठी पुढच्या आवतर्णाची वाट पहावी लागणार आहे.
म्हैशाळच्या जत मुख्य कालव्यातून बिंळूर
कालव्यात पाणी सोडण्यात आले.