जत,प्रतिनिधी: तालुका स्तरीय सी.एम.चषक 2018 भव्य कुस्ती स्पर्धेचे मंगळवारी सकाळी 9 वाजता आ.विलासराव जगताप, भाजप नेते डॉ.रविंद्र आरळी सह भाजप पदाधिकाऱ्यांना उपस्थितीत होणार आहे.तालुक्यातील क्रिडा पट्टूना देश व राज्य पातळीवर चालना मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे विधानसभानिहान नियोजन केले आहे. यातील विजेते स्पर्धेकांनी जिल्हा,राज्य,देश पातळीवरील स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. जत शहरानजिकच्या अॅड.प्रभाकर जाधव यांच्या फर्म हाऊसवर या स्पर्धा होणार आहेत.तालुक्यातील मल्लांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक डॉ.रविंद्र आरळी यांनी केले आहे.