जत,प्रतिनिधी : जाडरबोबलाद सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन प्रदिप धुमगोंड यांच्या विरोधात अविश्वास ठराव नऊ अधिक चार अशा फरकाने मंजूर झाला आहे.काँग्रेस नेते विक्रम सावंत यांनी पैसे देऊन सदस्य फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र,तो निष्फळ ठरला आहे.सोसायतील सदस्यांनी आमच्या बाजूने मतदान करून विश्वास कायम ठेवला आहे.जाडरबोबलाद विकास कामांना आमचे प्राधान्य आहे.त्यामुळे सोसायटी सदस्य,जनता आमच्या बरोबर आहेत.अशी माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी-पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.जाडरबोबलाद मध्ये आमचा गट फोडण्याचा प्रश्न फसला आहे.सोसायटीतील अविश्वास
दि.17 नोव्हेंबर रोजी दाखल केला होता. तो दि.22 नोव्हेंबर रोजी नऊ विरूध चार अशा बहुमताने मंजूर करण्यात झाला आहे.
ते म्हणाले, ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच म्हणून प्रमुख सदस्यांना प्रत्येकी एक वर्षाची संधी देण्याचे ठरले होते. यासाठी उपसरपंचपदी मागासवर्गीय समाजातील प्रकाश काटे यांना संधी दिली आहे. मात्र, चेअरमन प्रदिप धुमगोंड यांनी निवडीला विरोध करत काँग्रेसमध्ये जाण्याचा इशारा दिला होता. यासाठी जाडरबोबलाद गटातील काँग्रेस नेते संतोष पाटील यांनी यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. याला जातीय रंग देऊन माझी बदनामी करण्याचा डाव रचला होता. तो सदस्यांनी आमच्या पाठिशी राहून हाणुन पाडला आला.
तर अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर तेरा पैकी नऊ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने राहीले. त्यामुळे विरोधकांना अपेक्षीत असलेला हेतू साध्य करता आलेला नाही. जाडरबोबलाद गटातील मतदार पूर्वापार आमच्या घराण्यांवर विश्वास ठेवून समाजकारण असो किंवा राजकारण यात सोबत राहिले आहेत. त्यामुळे सर्व स्तरातील घटकातील कार्यकर्त्यांना संधी देणे गरजेचे आहे. ते मी केले, त्यामुळे काही नाराजांनी याला विरोध केला. तरीही आपल्या भूमिकेत ठाम राहून मागासवर्गीय समाजातील कार्यकर्त्यांला न्याय दिला. तर सदस्यांनी देखील आमच्या भूमिकेचे समर्थन करत प्रदिप धुमगोंड यांच्यावरील अविश्वास ठरावाच्या बाजूने राहिले. त्यामुळे ग्रामपंचायत व सोसायटीला कोणतेही खिंडार पडले नसून आमचा गड लोकांच्या विश्वासवर कायम आहे.असेही रवीपाटील यांनी सांगितले.