शेगावात घरावर सशस्ञ दरोडा दाम्पत्यास मारहाण : सात लाखाची रोखड,सात तोळे सोने लंपास

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील शेगाव येथील व्यापारी साहेबराव विठ्ठल शिंदे यांच्या घरावर सात जणाच्या टोळीने सशस्ञ हल्ला दरोडा टाकला.रिव्हालवराचा धाक दाखवून तीन लाखाच्या रोकडसह सुमारे पाच लाखाचा मुद्देमाल पळविला.टोळीने शिंदे त्यांच्या पत्नीस बेदम मारहाण केली.ही घटना बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. घरीसमोरील सीसीटीव्ही कँमेरात काही दरोडेखोर कैद झाले आहेत. याप्रकरणी शिंदे यांनी जत पोलीसात फिर्याद दिली आहे.

अधिक माहिती अशी,जत-पंढरपूर महामार्गावर शेगाव पासून जतरोडला बोराडे पेट्रोल पंपासमोर रस्त्यालगत विठ्ठल शिंदे यांचे बनशंकरी टेड्रर्स हे बिल्डिंग मटेरियल विक्रीचे दुकान आहे.तेथेच शिंदे पत्नी,दोन मुलासह राहतात.चोरीच्या घटनाच्या पाश्वभूमीवर त्यांनी घर,दुकानला सीसीटीव्ही कँमेरे लावले आहेत.मंगळवारी रात्री शिंदे कुंटूबिय झोपी गेले होते.

Rate Card

हेही वाचा ; उमदी | परिसरात अवैध धंद्यांना ऊत,मटका,दारूअड्डे बेधडक सुरु : सुभेदारी दिल्यासारखा पोलीसाचा कारभार |

मध्यरात्री पहाटे तीनच्या सुमारास सहा ते सात अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीने घराच्या दरवाज्यावर मोठा दगड घातला.त्या दरवाज्या तुटल्याने दरोडेखोर घरात शिरले.शिंदे कुटुंबिय झोपेत असताना अचानक झालेल्या आवाजाने जागे झाले.त्याक्षणी टोळीतील दोघा दरोडेखोरांनी शिंदे यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला.त्याच्यासह बरोबर पत्नी वर्षाराणी यांनीही लाथा,बुक्या हाणत, धक्काबुक्की केली.मुलांच्या गळ्यावर धारदार शस्ञे लावली. शिंदे यांच्याही डोक्याला रिव्हालवर लावत,घरात जेवढे सोने,रोख रक्कम आहे,तेवढे काढून दे नाहीतर गोळी घालीन अशी धमकी दिली.तर अन्य एका दरोडेखोरांने मुले अविष्कार,अभिमन्यू यांना जिंवत सोडणार नाही असा दम दिल्या.घाबरलेल्या शिंदे यांनी दिवसभर दुकानात जमा झालेले रोख तीनलाख काढून दिले.त्याशिवाय पत्नी वर्षाराणी यांच्या अंगावरील सोन्याचे दागिणे दरोडेखोरास दिले.काही दरोडेखोरांनी घरातील तिजोरी,कपटात साहित्य विस्कटून टाकत किंमती वस्तू शोधण्याचा प्रयत्न केला.परत जाताना टेबलवर असलेले दोन किंमती मोबाईल असा सुमारे 4 लाख 90 हाजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल घेऊन टोळीने पलायन केले.अर्धा तासात शिंदे यांच्या घरावर दरोडा टाकला. यादरम्यान तोंडाला मास्क लावून आलेले दरोडेखोर शिंदे यांना दरडावत एवढे मोठे दुकान आहे.पैसे काढ म्हणत होते.सर्वजण मराठीत बोलत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. दरोडेखोर चारचाकी गाडी मुख्य रस्त्यावर चालू स्थितीत उभी करून आले होते.ते थेट घराबाहेरील रोडवरून कुठे सीसीटीव्ही कँमेरा आहे का बघत होते.कँमेरा दरावज्या समोर दिसताच,एकट्याने घरीसमोरील गाडीवर चढून कँमेराचे तोंड भिंतीकडे फिरवले.त्यांच्या तेथेपर्यतच्या हालचाली सीसीटिव्हीत कैद झाल्या आहेत. त्यांनतर सहा-सात दरोडेखोर घरात शिरले.आरामात दहशत करत तीन लाख रोख,सात तोळे सोने,दोन मोबाईल असा मुद्देमाल घेत घराच्या दरवाज्याला बाहेरून कडी लावून पळ काढला.दरोडेखोर पळून जाताना सीसीटीव्हीचा डिव्हीआर नेहण्याऐवजी वायफायला जोडणारा अँडपटर नेहल्याने दरोडेखोरांचे सीसीटीव्हीतील व्हिडीओ पोलीसांना पाहता आले. शिंदे यांनी आरडाओरडा केल्याने शेजारील संतोष राठोड यांनी घराची कढी काढल्याने हा प्रकार समोर आला.घटनेची माहिती शिंदे यांनी जत पोलीसांना दिली. जत पोलीसासह,स्थानिक गुन्हे पथक,डॉग स्कॉड,फिंगर प्रिंटचे टिमने घटनास्थंळी भेट देऊन नमुने घेत तपास सुरू केला आहे. पोलीसाच्या तिन टिम वेगवेगळ्या भागात दरोडेखोराचा शोध घेत आहेत.

कुकटोळी घटनेसारखा दरोडा

कवटेमहाकांळ तालुक्यात कुकटोळी येथे मंगळवारी सहा जणांच्या टोळीने सशस्ञ दरोडा टाकला होता.तशाच पध्दतीने शेगाव येथील शिंदे यांच्या घरावर दरोडा पडल्याने त्यांच घटनेतील टोळीने हा दरोडा टाकला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.जिल्ह्यात सलग ही दरोड्याची दुसरी घटना घडल्याने नागरिकांत भितीचे वातावरणात पसरले आहे.

शेगाव ता.जत येथील साहेबराव शिंदे यांच्या घरातील साहित्य दरोडेखोर असे विस्कटून टाकले आहे.दरवाज्यावर दगड टाकल्याने दरवाज्या तुटला.घराबाहेरील सीसीटीव्ही कँमेरात कैद झालेले दरोडेखोर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.