कुडणूर खूनप्रकरणी संशयिताचा शोध सुरू,जून्या वादातून घटना

0

जत,प्रतिनिधी: कुडणूर ता.जत येथे बुधवारी रात्री सिध्दनाथ बाबासो सरगर याचा धारदार शस्ञाने हल्ला करून खून करण्यात आला होता.
लक्ष्मीपुजनाच्या दिवशी झालेल्या खूनाच्या घडनेने कुडणूर सह परिसरात खळबंळ उडाली होती.व्यवसायाने ट्रक्टर चालक असलेल्या सिध्दनाथ यांचा जून्या वैरत्वातून खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गावातील टेम्पो चालक प्रमोद तानाजी खांडेकर यांच्याशी सिध्दनाथचे जूना वाद होता.सहा महिन्यापुर्वी त्यांच्यात हाणामारीपर्यत वाद झाला होता.बुधवारी रात्री त्यांच्यात वाद झाला.यामुळे सिध्दनाथवर प्रमोद चिडून होता.सिध्दनाथ दुचाकीवरून सरगर येथील घरी जात असताना प्रमोद यांने टेम्पोतन पाठलाग केला.खांडेकर वस्तीनजिक त्याने सिध्दनाथच्या टेम्पो अडवा उभा केला.टेम्पोतून उतरून दुचाकी शेजारी उभा राहिलेल्या सिध्दनाथच्या डोक्यात गाडीतील टॉमीचा प्रहार केला.त्यात सिध्दनाथची डोक्याची कवटी फुटल्याने तोट जागीच ठार झाला. त्याला तेथेच टाकत संशियत प्रमोदने टेम्पो घेऊन पलायन केले.जत पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे. गुरूवारी संशियत प्रमोदचा टेम्पो एमएच-10,झेड-4667 हा जत येथे पोलीसाना आढळूंन आला.पोलीसानी टेम्पो ताब्यात घेतला आहे. संशियत आरोपीला पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत.दरम्यान प्रमोद शिवाय अन्य आरोपी आहेत का? यांचाही शोध घेतला जात आहे.सर्व शक्यता पडळून पाहत आहोत. नेमका खून कशासाठी केला यांचाही तपास सुरू आहे. लवकरचं आरोपीला पकडू असे तपासअधिकारी सा.पो.नि.रणजित गुंडरे यांनी सांगितले.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.