कुडणूर येथे तरूणाचा खून

0

जत,प्रतिनिधी: कुडणूर ता.जत येथील सिध्दनाथ बाबासो सरगर (वय-25) या तरूणाचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्ञाने वार करून खून केल्याची घटना बुधवारी रात्री आठच्या सुमारास घडली.
अधिक माहिती अशी, सिध्दनाथ हा तरूण ट्रक्टर चालक आहे.तो कुडणूर हद्दीतील सरगर वस्तीवर राहतो.बुधवारी लक्ष्मी पुजनाचे साहित्य आणण्यासाठी
मोटारसायकल वरून कुडणूर गावात गेला होता. रात्री आठच्या सुमारास परत घरी येताना खांडेकर वस्ती जिल्हा परिषद शाळेजवळ अज्ञाच व्यक्तीने त्यांची मोटारसायकल थांबवून त्यांच्यावर हल्ला केला.या हल्ल्यात धारदार शस्ञाचा घाव डोक्यात वर्मी बसल्याने तो जागीच ठार झाला.हल्यानंतर मारेकरी फसार झाले आहेत. सिध्दनाथ याचा मत्तदेह व मोटारसायकल खांडेकर वस्ती जवळ आंढळून आली.गावकऱ्यांनी पोलीसाना या घटनेची खबर दिली असून पोलीस घटनास्थंळी दाखल झाले आहेत. पोलीसांनी खून्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे.दरम्यान ऐन दिवाळी सणात खूनाची घटना घडल्याने खंळबळ माजली आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.