राजे रामराव महाविद्यालयाने अनेक संस्कारक्षम पिढ्या घडवल्या : ना.सुभाष देशमुख

0

जत,प्रतिनिधी:श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या राजे रामराव महाविद्यालयाने गेल्या पन्नास वर्षात अनेक संस्कारक्षम पिढ्या घडवण्याचे काम केले आहे गौरवउद्गार सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री सुभाष देशमुख यांनी काढले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या सुवर्णमोहोत्सव उद्घाटन समारंभात बोलत होते.यावेेेळी आ.विलासराव जगताप प्रमुख उपस्थितीत होते.

देशमुख पुढे म्हणाले की प्राध्यापक व विद्यार्थी यांच्यामुळेच शिक्षण संस्थांना नावलौकिक प्राप्त होतो. या वर्षी महात्मा गांधी यांचा 150 वा जन्मदिन, डॉ बापूजी साळुंखे यांचा 100 वा जन्मदिन आणि राजे रामराव महाविद्यालयाचा 50 वा जन्मदिन असा त्रिवेणी संगम जुळून आला आहे. विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता व्यावसायिक शिक्षण घेऊन उद्योग धंदे उभे राहावेत. राष्ट्रहितासाठी तरुणांनी मतदानाच्या प्रक्रियेत भाग घेऊन समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान द्यावे. जतचे आमदार विलासराव जगताप म्हणाले की,मी या संस्थेचा विद्यार्थी आहे.याचा मला सार्थ अभिमान वाटतो. सुसंस्कृत व शिस्तप्रिय नागरिक घडवण्यात या संस्था मोलाचे कार्य करतात. आज पैशाने ज्ञान विकत घेता येते अशी स्थिती असताना बापूजी साळुंखे यांनी चालू केलेली ज्ञान मंदिरे श्रमाल प्रतिष्ठा देणारे आणि समाजाचे प्रबोधन करणारे केंद्रे आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही एस ढेकळे यांनी सुरवातीला प्रास्ताविक पर मनोगतात 1969 साली अवघ्या 67 विद्यार्थ्यांवर चालू झालेल्या महाविद्यालयाचा 50 वर्षाचा आढावा घेतला. या कार्यक्रमात या महाविद्यालयातले पहिले प्राध्यापक पा. ना.व्हनमाने व पहिल्या वर्षाच्या विद्यार्थिनी हेमलता उटगिकर आणि निर्मला इंगवले यांचा सत्कार करण्यात आला. सुवर्णमहोत्सव समितीचे समन्वयक डॉ श्रीकांत कोकरे यांनी पन्नास वर्षातील माजी प्राचार्यांचा कार्याची माहिती दिली.यावेळी डॉ. अशोकराव जगताप, डॉ.युवराज भोसले, डॉ.अनिल पाटील, डॉ.जे एस पाटील, डॉ.एस वाय होनगेकर, डॉ.शिवाजीराव बिसले, डॉ.मिलिंद हुजरे या माजी प्राचार्यांचा सत्कारही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चंद्रसेन मानेपाटील यांनी तर आभार डॉ श्रीकांत कोकरे यांनी मानले.

Rate Card

जत,येथे रामराव महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी  कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री सुभाष देशमुख,आ.विलासराव जगताप  व मान्यवर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.