पोस्ट कर्मचाऱ्यांस राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण
जत,प्रतिनिधी: जत शहर पोस्ट कार्यालयातील पोस्ट मास्तर रमेश हिरगोंड व कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी जत पोलिसात सात जणाविरोंधात गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी काम बंद अंदोलन केल्याने दिवसभर पोस्ट कार्यालय बंद होते.

अधिक माहिती अशी, जत शहर पोस्ट कार्यालयात रमेश काडाप्पा हिरगोंड (वय-51) रा.रावळगुंडवाडी हे पोस्ट मास्तर म्हणून काम करतात.सध्या पोस्ट कार्यालयाकडे आधार कार्ड काढणे,दुरूस्तीचे काम शासनाने दिले आहे. त्यासाठी हिरगोंड काम करत होते.बुधवारी सकाळी आधारचे काम करत असताना राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहरअध्यक्ष सतिश उर्फ पवन शहाजी कोळी व अशोक मलकारी कोळी(दोघे रा.जत)यांनी मी राष्ट्रवादी कॉग्रेसचा अध्यक्ष आहे.माझ्या माणसाचे आधार कार्ड लवकर काढून द्या म्हणून दमदाटी केली.हिरगोंड यांनी फॉर्म भरून नंबरमध्ये थांबा म्हणून सांगितले. त्यांनतर थोड्या वेळा नंतर पवन कोळी,अशोक कोळी व अन्य 4 ते 5 जणांनी पोस्ट कार्यालयात येऊन हिरगोंड यांना धक्काबुकी करून तुला काम करता येत नाही.काठीने मारहाण केली.त्यात इतर कर्मचारी मारूती कोळी,शिवाजी भोसले,कपिल चक्कावार,कुडलिंक कोळी,वैभव धवडे यांनी मध्यस्थी केली असता सर्वांनी मिळून त्यांनाही काठीने मारहाण करून जखमी केले आहे. याप्रकरणी सात जणाविरोंधात जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान मारहाण झाल्यानंतर जत पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिवसभर काम बंद अंदोलन केले.त्यामुळे अनेक नागरिकांची मोठी गैरसोय झाली.अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही.अधिक तपास हवलदार विजय वीर करत आहेत.