क्रांतीकारी वृत्तपत्र एंजन्ट,विक्रेत्याचा भव्य मेळावा संपन्न
आष्टा : येथे क्रांतीकारी वृत्तपत्र एंजन्ट, विक्रेता संघटनेचा भव्य मेळावा संपन्न झाला.

माजी नगराध्यक्ष झूंजारराव पाटील,व संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष हणमंतराव निकम यांच्या हस्ते सरस्वती पुजन,व दिप्रज्वलन करून सुरूवात करण्यात आली.यावेळी उपाध्यक्ष अनिल कुंभार,राजू माळी,धंनजय बोधे,बालम जमादार, प्रमोद कुलकर्णी, अनिल नांगरे,ए.एस.कुंभार,पवार रांजणी,अनिल माने,विश्वनाथ चौगुले,विजय मिठारे,आदी सुमारे 80 वर एंजन्ट उपस्थित होते. त्याशिवाय दैनिंक पुण्यनगरीचे वितरण व्यवस्थापक विजय शिंदे,पुढारीचे रमेश पाटील व आष्टातील सर्व दैंनिकाचे प्रतिनिधी उपस्थित होते.धंनजय बोधे यांनी प्रस्तावित,आभार केले.
वृत्तपत्र विक्रेत्यांना विविध प्रश्नावर या मेळाव्यात परामर्श करण्यात आला. निकम यांनी वृत्तपत्र एंजन्ट विक्रेत्यांच्या संघटनेची मुल्ये,केलेली कामे व संघटनेचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले.संयोजन अनिल कुंभार यांनी केले.