समाजाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करू : शरद कोळी

0

वळसंग,प्रतिनिधी : वळसंग (ता.जत)येथे अश्विन शु- रेवती नक्षत्र पौर्णिमेचे औचित्य साधत तिथीनुसार असलेली रामायण रचायता आदीकवी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.विलासराव जगताप, प्रमुख पाहुणे म्हणून धाडस सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याध्यक्ष शरद कोळी व माजी सभापती प्रकाश जमदाडे, नगरसेवक विजय ताड,साहेबराव कोळी,माजी पंचायत समिती सदस्य एम.के. पुजारी,आप्पासो पाटील,सरपंच मनीष चव्हाण,अॅड.रेऊर व समाजाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कोळी,युवा जिल्हाध्यक्ष नरेंद्र कोळी, व पंचक्रोशीतील समाज अध्यक्ष व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.आ. जगताप यांच्या शुभ हस्ते वाल्मिकी सर्कलचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे शरद कोळी म्हणाले की,कोळी समाजाच्या प्रलंबीत प्रश्नासाठी शासनाने निर्णय घ्यावेत. समाजाने आत्तापर्यंत संघर्ष केला आहे.कोळी समाजाच्या मागण्याचे आश्वासने देऊनही सत्ताधारी सरकार बेदखल केले आहे. मुख्यमंत्री साहेबांनी शंब्द फिरवला आहे.समाजाच्या न्याय हक्कासाठी शांततेच्या मार्गाने मागणी केली आहे.तरीही आम्हाला न्याय मिळाला नाही.यापुढे कोळी समाजाचा तीव्र संघर्ष शासनाला पहावा लागेल.यापुढे समाजबांधवाना प्रश्नासाठी मी सदैव तत्पर आहे.कोणत्याही अडचणीसाठी संपर्क करावा.स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कोळी समाजाला न्याय द्यावा असे आवाहन शरद कोळी यांनी शेवटी केले.तालुक्यातील अनेक गावात धाडस संघटनेच्या शाखाचे उद्घाटन कोळी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मोठ्या प्रमाणावर समाज बांधव उपस्थित होता. वळसंग धाडस सामाजिक संघटनेच्या शाखेच्या शाखाध्यक्षपदी सिध्दाप्पा नाटेकर, उपाध्यक्ष केंचाप्पा कोळी, व सचिव म्हणून सचिन कोळी यांची निवड करण्यात आली.  

Rate Card

वळसंग ता.जत येथील वाल्मिकी जंयती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना धाडस संघटनेचे अध्यक्ष शरद कोळी व मान्यवर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.