गुणवत्तापूर्वक तपासासाठी समन्वयाची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

सांगली :  गुन्हा सिध्दतेच प्रमाण वाढून गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी वर्गाने फिर्याद दाखल करताना कलमांचा आभ्यास करून कलमे लावणे आवश्यक आहे. तसेच गुन्ह्याचा तपास गुणवत्तापूर्ण करणे, या बाबी समन्वयपूर्वक पार पाडण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत केले.यावेळी व्यासपीठावर सहकारमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख, मुख्यमंत्री महोदयांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी वि. ना.काळम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे उपस्थितहोते.अधिकाअधिक गुन्ह्यांचा तपास होऊन गुन्हेगारांना शिक्षा होणे, चोरीला गेलेल्या गुन्ह्यात गुन्हेगार सापडून जनतेला त्यांच्या गेलेल्या वस्तु परत मिळणे यासाठी गुणवत्तापूर्ण तपास होणे आणि तपास यंत्रणेतील सर्व घटकांमध्ये सुयोग्य समन्वय असण गरजेचे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, पोलीस स्थानक पातळीवर याबाबत नियुक्त असलेल्या समितीचे मार्गदर्शन व मदत यासाठी होणे आवश्यक आहे. सामान्य जनांमध्ये पोलीस दलाप्रती विश्वास वृध्दींगत होण्यासाठी पोलीस विभागामार्फत जनजागृतीचे विशेष प्रयत्न करायला हवेत. सरकारी वकील, पोलीस यंत्रणा, साक्षिदार, फिर्यादीमध्ये अनुषंगिक कायद्याच्या कलमांचा उल्लेख, फोरॉन्सिक लॅबकडील अहवाल या सर्व बाबींमध्ये योग्य समन्वयाने कार्य केले तर गुन्हे सिध्द होऊन गुन्हेगारांना शिक्षा होण्याच प्रमाण वाढण्यास मदत होण्याबरोबरच जनतेचाही पोलीस दलावरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होईल.आता ऑनलाईनतक्रार दाखल करण्याची सुविधा सुरू झाली आहे याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की, ऑनलाईन तक्रारीची दखल घेऊन त्याचे फिर्यादीत रूपांतरहोण्यासाठी पोलीस विभागाने विशेष दक्षता घेण्याबरोबरच या ऑनलाईन तक्रार उपक्रमाबाबत जनतेत अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेषमोहीम हाती घ्यावी. विश्रामबाग पोलीस मुख्यालयातील कर्मचारी वसाहतीबाबत आवश्यक त्या निधीची तरतूद करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.कुरळप प्रकरणाचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की, पोलीस स्थानकांच्या परिसरातील शैक्षणिक संस्था, आश्रमशाळा यांना पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी वारंवार भेटी द्याव्यात  माहिती घ्यावी म्हणजे भविष्यात असे प्रकार होणार नाहीत. पुणे फोरॅन्सिक लॅब येथून उशिरा अहवालयेण्याबाबतही त्यांनी संबंधित पोलीस स्थानकांना अहवाल कमीत-कमी वेळात पाठविण्याचे यावेळी त्यांनी सूचित केले.या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षकसुहेल शर्मा यांनी जिल्ह्यातील गुन्हे तपासाचे प्रमाण, निर्भया पथक, सांगली शहरात सांगली पोलीस दलामार्फत राबविण्यात आलेले उपक्रम यांची सविस्तरमाहिती पॉवर पॉईंट प्रेन्झेटेशनच्या माध्यमातून यावेळी दिली.

     बैठकीस जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे तसेच तालुकास्तरावरील सरकारी वकील व पोलीस दलाचे जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.