शासन निर्णयानुसार सरपंचांना ओळखपत्र द्या:बसवराज पाटील

0
3

जत,प्रतिनिधी:राज्यातील ज्याप्रमाणे खासदार,आमदार व जिल्हा परिषद सदस्यांना ओळखपत्र देण्यात येतात. त्याचप्रमाणे सरपंचांनाही त्यांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी ओळखपत्र देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. शासन आदेशा नुसार जत तालुक्यातील सर्व सरपंचांना त्वरित ओळखपत्र देण्यात यावेत अशी मागणी सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केले आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, जत तालुक्यात एकूण 116 गावातील ग्रामपंचायतीमध्ये सरपंच कार्यरत आहेत.यापैकी एकाही सरपंचांला प्रशासनाने ओळखपत्र दिलेले नाहीत.संरपचाना ओळखपत्राची प्रतीक्षा आहे.
एकंदरीत गावातील कामासाठी तालुका किंवा जिल्हा पातळीवर अनेक शासकीय कार्यालयात जाताना सरपंचांचा उत्साह टिकून रहावा व त्यांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही हा या ओळखपत्र देण्यामागचा शासनाचा उदात्त हेतू आहे.अशी ओळखपत्रे यापुर्वी आमदार, खासदार, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले जाते. राज्य शासनाने जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायतच्या सरपंचांनाही ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी 11 फेब्रुवारी 2014 रोजी राज्य शासनाने अध्यादेशही (जीआर) काढला गेला. जि. प. सदस्य, पं. स. सदस्य व सरपंचांना प्रशिक्षणासाठी किंवा अनेक कामासाठी जिल्ह्याबाहेर जावे लागते, कामानिमित्त बाहेर गेल्यावर विशेषतः महिला सरपंचांना स्वत:ची ओळख पटविताना होणारी अडचण दूर करण्यासाठी आणि प्रसंगानुरूप उपयोगी पडावे हा ओळखपत्र देण्यामागील उद्देष आहे. परंतु या निर्णयाची योग्यरित्या अंमलबजावणीच होत नाही. गावच्या प्रमुखालाच ‘ओळख’ उरलेली नाही. म्हणून आपणा कडून लवकरात-लवकर या निर्णयाची अंमलबजावणी होऊन जत तालुक्यातील सरपंचांना ओळखपत्र मिळावेत अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांना देण्यात आली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here