अऩ्यायकारक भारनियमन मागे घ्या : सुभाषराव गायकवाड

0

डफळापूर,वार्ताहर:जत तालुक्यात वीज वितरण कंपनीने सुरू केलेले अन्याय कारक भारनियमन बंद करावे अन्यथा मराठा स्वराज्य संघाचे वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष सुभाषराव गायकवाड यांनी दिला आहे.याबाबतचे निवेदन वीज वितरण कंपनीला देणार असल्याचे त्यांनी सांगितले.शाळकरी मुलाची अभ्यासाची वेळ असणाऱ्या रात्री सहापासून भारनियमन केले जात आहे. त्याशिवाय दिवसभर सिंगल फ्जि,थ्री फ्जि लाईट वेळेतही भारनियमन होत असल्याने पिण्यासह जनावराच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.विज नसल्याने मोटारी बंद राहत आहेत.त्याशिवाय राज्यातील विज परराज्याला विकून तोटा भरून काढण्यासाठी सुरू असलेली वीज दरवाढही मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
ग्रामीण जनता, शेतकरी प्रचंड महागाईमुळे होरपळून निघत आहे.त्यातच यावर्षी जत तालुक्यात एकही मोठा पाऊस झाला नसल्याने खरीप आणि रब्बी हंगाम वाया गेला आहे.याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. त्यातच वीज दरवाढ झाल्याने आगीत तेल ओतण्याचा प्रकार झाला आहे. लोकांना जगणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे सरकारने केलेली वीज दरवाढ आणि भारनियमन माघारी घ्यावी
एका बाजूला भारनियमन करायचे आणि दुसऱ्या बाजूला वीज दरवाढ करायची याच्याने सामान्य माणूस आणि शेतकरी यांनी जगूच नये,अशी व्यवस्थाच सरकारने करून ठेवली आहे.हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही.सरकारने भारनियमन आणि वीज दरवाढ तात्काळ कमी करण्यात यावी, अन्यथा युवक रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.