संख,वार्ताहर: तालुक्यातील संख येथील तरूण सिध्दगोंडा परगोडा बिराजदार (वय-25) यांचा सोमवारी मध्यरात्री अनैतिक संबधाच्या संशयावरून कुऱ्हाडीने गळ्यावर वार करून खून करण्यात आला. मंगळवारी सकाळी उघडीस आला. उमदी पोलीसांनी काही तासात संशयिताला जेरबंद केले.
भरमाप्पा बिरापा करगजी,रा.संख असे संशयिताचे नाव आहे. त्यांच्या पत्नीशी सिध्दगोंडा यांचे अनैतिक संबध असल्याच्या संशयावरून मध्यंरात्री खून केल्याची कबूली पोलिसांना दिली आहे. उमदी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.अधिक माहिती अशी, सिध्दगोंडा यांचे संखपासून चार किलोमीटर अंतरावर मध्यम तलावालगत घर आहे. त्यांच्या शेजारी भरमाप्पा करजगी यांचे घर आहे. भरमाप्पा याला सिध्दगोंडा यांचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबध असल्याचा संशय होता.त्यावरून त्यांच्यात यापुर्वी अनेकवेळा वादावादी झाली होती. माझ्या पत्नीचा नाद सोड नाहीतर तुला संपवितो, अशी धमकीही भरमापाने दिली होती. दोनवेळा त्यांने कुऱ्हाड घेऊन सिध्दगोंडा याला धमकावले होते. सिध्दगोंडा यांच्या घरापासून काही अंतरावर त्यांनी नविन घराचे बांधकाम सुरू केले आहे. जून्या घरात आई-वडील,मोठा भाऊ राहतो. नविन
घरास अद्याप दरवाजे,खिडक्या, छत बसविलेले नाहीत. बांधकामाचे साहित्य असल्याने सिध्दगोंडा रात्री तेथेच मुक्कामास असतो.सोमवारी रात्री गावात नवरात्रोत्सवानिमित्त नाटकाचे आयोजन केले होते. नाटक बघून सिध्दगोंडा मित्रासोबत बाराच्या सुमारास घरी गेला. सिध्दगोंडा याला सोडून मित्र त्यांच्या घरी निघून गेले. मध्यंरात्रीच्या सुमारास भरमप्पा यांने सिध्दगोंडा झोपेत असताना कुऱ्हाडीने मानेवर वार केला. त्यात सिध्दगोंडा यांचा जागीच मुत्यू झाला. कुऱ्हाडीचा प्रहार एवढा जबरदस्त होता की, सिध्दगोंडा यांचे मुंडके धडावेगळे झाले. सकाळी सिध्दगोंडाचे वडील नवीन घरी आले. त्यावेळी त्यांना सिध्दगोंडा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी आरडा-ओरडा केल्याने बाजूचे लोक जमा झाले.त्यांनी उमदी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच सहा.पोलीस निरिक्षक भगवान शिंदे यांनी घटनास्थंळी भेट दिली व तपास सुरू केला.त्यादरम्यान पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या भरमाप्पा यांस पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता पत्नीशी सिध्दगोंडा यांचे अनैतिक संबध होते.त्याला अनेकवेळा समजावून सांगूनही त्यांने ऐकले नाही. त्यामुळे त्यांचा कायमचा काटा काढल्याचे त्यांने पोलीसांना सांगितले आहे.
घटनेनंतर काही तासात उमदी पोलिसानी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. घटनास्थळी पोलीस उपअधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी भेट दिली.
मयत सिध्दगोंडा