जत | आरेवाडी बिरोबा बनात धनगर आरक्षणाचे रणशिंग फुंकणार | प्रकाश शेंडगे : कर्नाटकचे माजी मुख्यंमञी सिध्दरामयाची उपस्थिती

0

जत,प्रतिनिधी:भाजप सरकारने सरकार येताच पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने गेल्या चार वर्षात टाटा अहवालाचे भूत मानगुठीवर ठेऊन वेळ मारून नेहली आहे.आता आमच्या संयमाचा बांध फुटला आहे.ज़्या धनगर समाजाने भाजपला सत्तेवर बसविले तो समाज आता त्यांना सत्तेवरून खाली उतरवणार आहे.त्यासाठी धनगर आरक्षणाचे रणशिंग फुकण्यासाठी आरेवाडीतील दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. अशी माहिती धनगर समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार बैठकीत दिली.दसरा मेळाव्याच्या पाश्वभूमीवर शेंडगे यांनी जतेत बैठक घेतली.यावेळी कुंडलिक दुधाळ,यशंवत सेने संस्थापक विवेक कोकरे,शंकर वगरे,म्हाळाप्पा पुजारी,अशोक बन्नेनवर,बंटी दुधाळ,बंडू डोंबाळे, युवा नेते सचिन मदने आदी मान्यवर उपस्थित होते.

गेल्या चार वर्षापासून सरकारने समाजाला झुलवत ठेवले आहे.पुढील तीन महिन्यात लोकसभेची आचारसंहिता लागणार आहे.त्यामुळे तीन महिन्यात सरकारने धनगर समाजाला आरक्षण द्यावे. अन्यथा यापुढे होणाऱ्या उद्रेकाला सरकार जबाबदार असेल.आरेवाडी येथे सलग तिसऱ्या वर्षी समाजाचा दसरा मेळाव्या मोठ्या प्रमाणात होणार आहे.आमचे काही युवक वेगळा मेळावा घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आमचे हे घरचे भांडण आहे.ते मिटविण्यासाठी आमचे सर्वोत्तपरी प्रयत्न सुरू आहेत.

समाजाची एकजुटीने बिरोबाचा भंडारा लावून  आरक्षणाचा एल्गार पुकारला जाणार आहे.या मेळाव्यात मार्गदर्शन करण्याकरिता

Rate Card

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिध्दरामया यांनाही निमंत्रित केले आहे.त्याशिवाय आमदार गणपतराव देशमुख,माजी मंत्री आण्णासाहेब डांगे,आमदार शेंडगे,आमदार आनिल गोटे,रामहरी रूपनर,रामराव वडकुते,दत्ता भरणे,नारायण पाटील,रायबागचे आ. विवेक पाटील,आमदार रमेश शेंडगे,विश्वास देवकते,आंनद पाटील, विजय मोरे, पोपटराव गावडे,हरिभाऊ शेळके, महापौर संगीता खोत,या मान्यवराच्या सर्व पक्षीय नेत्याची उपस्थितीत हा मेळावा होणार आहे.या मेळाव्यास मोठ्या संख्येने धनगर बांधवानी उपस्थित रहावे असे आवाहन शेंडगे यांनी केले.

पडकळकराचाही रविवारी दिवसभर तालुक्यात तळ

दसरा मेळावा,धनगर आरक्षणाचे रान उठवलेले धनगर समाजाचे माजी आमदार प्रकाश शेंडगे व गोपीचंद पडळकर जत तालुक्यात मेळाव्याच्या पाश्वभूमीवर बैठका घेतल्या.मात्र त्यांनी एकत्र येण्याचे टाळले.आमची पडळकर बरोबर चर्चा झाली आहे. एकत्र मेळाव्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आमचे हे घरचे भांडण आहे.ते मेळाव्यापुर्वी मिटेल असा विश्वास माजी आमदार शेंडगे यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला.दोन्ही नेत्यांनी मेळाव्याची स्वंतत्र तयारी केली आहे. त्यामुळे दोन मेळावे निश्चित आहेत.

जत येथील आढावा बैठकीत माजी आमदार प्रकाश शेंडगे व उपस्थित धनगर समाजाचे नेते

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.