पालकमंञ्याचा जतेत काही मिनीटाचा दुष्काळ पाहणी दौरा

0

जत,प्रतिनिधी : सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी जत तालुक्यातील दुष्काळी भागाचा शनिवारी दौरा केला.तालुक्यात त्याअर्थाने म्हैशाळ योजनेच्या पाण्याने सदन असलेल्या कुंभारीला त्यांनी भेट दिली.खरेतर जत तालुक्यातील पुर्व भाग दुष्काळाने होरपळत असताना म्हैशाळ लाभ क्षेत्रातील गावाच मंत्रीमहोदयांना दुष्काळ कसा दिसला असा उद्गिन्न सवाल जनतेतून विचारला जात आहे. तालुक्यातील सुमारे पंचवीसवर गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. टँकर मागणी करूनही प्रशासन टँकर देत नाही. अनेक गावात दिवस,रात्र पाण्यासाठी घालवावी लागत आहे. बालके,वयोवृध्द नागरिक पाणतळावर घागरी नंबरला लावून बसलेले दिसतात.गावात माणसं कमी पण ड्रम,कळशा,बादल्या जास्त अशी परिस्थिती आहे.पाऊस न पडल्याने चाऱ्याअभावी जनावरे व्याकूळ झाले आहेत. तशाच ओसाड माळावर येथील गोपालक शेतकरी जनावरे चरण्यासाठी सोडत आहे.कुठेही चारा न दिसणारे जनावरे मिळेल ते तोंडात घालत आहेत. असे ह्रदय हेलावणारे दृष़्य तालुक्यातील पुर्व भागात असताना पालकमंत्री तिसरीकडे दौरा करून शासन सर्वोत्तपरी मदत करेल असे सांगतात.प्रत्यक्षात जतची मुर्दाड महसूल यंत्रेणेचे अधिकारी टँकरमुक्तचा नारा देत नागरिकांना पाण्यासाठी मरणयातना देत आहेत. त्यावर बैठक घेऊन दुष्काळी उपाययोजना तातडीने द्याव्यात असे अादेश पालकमंञ्यांने देणे अपेक्षित होते.मात्र तसे न करता त्यांनी कुंभारी दहा मिनीटात दौरा उरकून प्रस्थान केल्याने तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

पालकमंञ्याकडून दुष्काळी जनतेची चेष्ठा
तालुक्यातील दुष्काळी गावे सोडून कुंभारी सारख्या बागायत गावाची पाहणी करून दुष्काळी दौऱ्याचा फार्स केल्याबद्दल पालकमंत्र्यांचा जत तालुका सरपंच परिषदेकडून निषेध करण्यात आला.तालुक्यातील पूर्व भागासह दक्षिण भागातसध्दा दुष्काळ आवासून उभा आहे. उमदी, माडग्याळ, संख, डफळापूर व बिंळुर भागातील गावात दुष्काळाची दाहकता गंभीर अाहे. तालुक्यातील 32 गावांनी या अगोदरच टँकरची मागणी केलेली आहे. अशी परिस्थिती असताना ज्या गावात दुष्काळ आहे ती गावे सोडून कुंभारी सारख्या सधन गावाचा दौरा करून दुष्काळी पाहणी दौऱ्याचा फार्स पालकमंत्री ना.सुभाषबापू देशमुख यांनी करून दुष्काळी जनतेची चेष्ठा केली आहे.
– बसवराज पाटील
तालुका अध्यक्ष सरपंच परिषद

                                                    

Rate Card

कुंभारी ता.जत येथे दुष्काळ पाहणी दौरा करताना पालकमंत्री सुभाष देशमुख,जि.प.अध्यक्ष संग्राम देशमुख, डॉ.रविंद्र आरळी,अॅड.प्रभाकर जाधव

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.