बेकायदेशीर दारू वाहतूकीवर छापा : सव्वा तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

0

जत,प्रतिनिधी: जत शहरातून बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्या बुलेरो जीपवर छापा टाकून 3 लाख 16 हाजार 402 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सचिन केशव काटे रा.मुंचडी या संशियताला ताब्यात घेण्यात आले आहे.जत पोलीसांनी शुक्रवारी पहाटे ही कारवाई केली.

जत शहरातील बसवेश्वर चौक येथे शनिवारी पहाटे एमएच-10,बीएक्स-8248 या बुलेरो गाडी संशास्पद जाताना शहरात नाकाबंदी करणाऱ्या हवलदार विजय वीर व राजू कांबळे यांना आढळंली.त्यांनी गाडी अडवत तपासणी केली असता गाडीत देशी विदेशी दारूच्या 16,402 रूपये किंमतीच्या 107 बॉटल सापडल्या.त्या जप्त करत संशियताला गाडीसह ताब्यात घेण्यात आले.हे मद्य जतहून मुंचडीला जात होते. बेकायदेशीर मद्यवाहतूक कायद्याअतर्गत त्यांच्या वर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान शहरात बेकायदेशीर दारूची वाहतून होत असल्याचे पुन्हा समोर आले आहे.पोलीसांची तुटपुंजी कारवाईने त्यात काहीही बद्दल होत नाही.जत,शेगाव बेकायदेशीर दारू पुरवठ्याचे मोठे केंद्र अाहे.तेथून तालुकाभर रात्रभर दारू वाहतूक सुरू असते.पोलीसांनी यात सतर्क राहणे गरजेचे आहे.

Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.