आमसभेत महसूलच्या अधिकारी,तलाठी कर्मचाऱ्यांचा बुरखा फाडला

0

जत,प्रतिनिधी: जत तालुक्यात महत्वाचा असणाऱ्या महसूल विभागाकडून राजरोसपणे लाच स्विकारत कामकाम सुरू असते.प्रशासकीय कामाबरोबर,वाळू तस्करीतून महसलूचे अधिकारी,कर्मचारी,तलाठी गंबरगंड झाले आहेत.कोतवालतर लाखोत खेळत आहेत.पगाराचा विचार करता इतकी माया अाली कोठून हा संशोधनचा विषय आहे. जवळपास सर्वच कामांना टेबल खालून पैसे दिल्याशिवाय पानच हालत नाही.हे वास्तव आहे.साध्या महसलूचा संलग्न असणाऱ्या स्टँप विक्रेत्यांकडून स्टँपची जादा पैशाने विक्री होत आहे.त्यांच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे होऊनही बद्दल होत नाही.
या सर्व प्रकारला वैतागलेल्या नागरिकांनी शनिवाराच्या आमसभेत महसूल प्रशासनाच्या अधिकारी, कर्मचारी, तलाठ्याचा बुरखा फाडला. थेट कोन किती पैसे घेतय यांची कुंडली नागरिकांनी आमसभेपुढे मांडली.तर प्रशासकीय कामासाठी कशी पिळवणूक होते.यांचे वास्तव मांडले.साधे दाखले काढण्यासाठी कोतवाल,उमेदवाराच्या हातात शंभर रूपयाची नोट ठेवावी लागत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या.कायम जत तालुक्यातील कार्यालये अधिकाऱ्यांना धनाधिस बनवतात.हा इतिहास आहेच.मात्र सामान्य जनतेची कामे अडवूण जी पिळवणूक सुरू आहे. ती निंदनीय आहे.तालुक्यात येणारे अधिकारी सहा महिन्यात करोडोत खेळतात.साधे तलाठी जतला हजर होताना बसने येतात.सहा महिन्यात किंमती चारचाकी गाड्या घेऊन फिरतात.हे पगारात कसं शक्य आहे. दुसरीकडे 25 एकर शेती असणारा आमचा शेतकरी गावातून जत स्टँडपर्यत एसटीने येतो.तेथून पुढे दोन किलोमीटर पुढे  असणाऱ्या तहसील कार्यालयापर्यत येण्यासाठी रिक्षाला वीस रूपये द्यावे लागतात.म्हणून चालत येतो.दिवसभर या तलाठी,अधिकाऱ्यांच्या मागे लागून वैतागतो,भुकेने व्याकूळ होतो.मात्र निसर्गाची अवकृपा फाटक्या परिस्थितीने फक्त पाणी पिऊन पोटाला पिळ देऊन आपली कामे व्हावीत म्हणून साहेबाच्या समोर बसतो.साहेबाची मर्जी लवकर झाली तर बरं नाहीतर,सकाळी आलेल्या शेतकऱ्यांचा नंबर अगदी सायकांळी ऑफिस बंद व्हायच्या वेळेला येतो.त्या अगोदर साहेबाच्या मर्जीतील एंजटाची कामे उरकली जातात.त्यात दिवसभराचा माल जमा करून घेतात.मग आमच्या 25 एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांचा नंबर येतो.साहेब तोऱ्यांत अडचणी सांगतात.पोटाला पिळ देऊन वाचविलेले पैसे या अधिकाऱ्यांला टेबल खालून दिले की साहेबाची सही झाली म्हणा अशी स्थिती या तालुक्यातील जमीनदार शेतकऱ्यांची आहे.याकडे आश्वासने देऊन मताचा जोगवा मागणारे नेते जनतेच्या आशा आकांक्षाचा चुराडा करून निवडणूक संपताच स्वंयघोषित होतात.पुन्हा निवडणुक समोर दिसताच जनतेचे प्रश्न त्यांना दिसतात.तेथून पुढे सभा,बैठकाचा जोर चालू होतो. कामाची वल्गना केली जाते. अंदोलने केले जातात.सत्ताधारी उपोषण करतात.तरीही गेल्या सुमारे  71 वर्षापासून प्रश्न सुटतात हे विशेष. जर वेळी नविन येतो.हे येतील दुर्देव्य..!,तालुक्यातील राजकीय नेते,अधिकारी,कार्यकर्त्यांच्या दलालीने जत तालुक्यातील एकही काम व्यवस्थित टिकावू झालेले नाही.त्यास भरीस भर म्हणजे मुर्दाड प्रशासकीय यंत्रणा जनतेला पिळवणूकीचे साधन करत आहेत. जत तालुक्यातील महसूल,पंचायत समिती, पोलीस स्टेशन,नगरपरीषदेसह सर्वच विभागात भष्ट्राचाराने जनतेच्या भौगोलिक सुविधेचेही दैना करून ठेवली आहे.

Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.