जतची दुष्काळी परिस्थिती बदलविण्यासाठी शैक्षणिक क्रांती गरजेची : अॅड.जाधव

0

जत,प्रतिनिधी: दुष्काळी जनतेचा दुष्काळ संपवायचा असेलतर याभागातील शिक्षणाचा दर्जा सुधारून उच्चदर्जाचे शिक्षण येथे देणे गरजेचे आहे. असे मत अॅड.प्रभाकर जाधव यांनी गुळवंची येथे व्यक्त केले.शेगाव मतदार संघाच्या विकासाचा ध्यास घेतलेले अॅड.प्रभाकर जाधवव जि.प.सदस्या स्नेहलता जाधव दांपत्यानी मतदार संघातील शाळा सक्षम करण्यावर भर दिला आहे. जिल्हा परिषद शाळा डिजिटल करत नवी पिठी अत्याधुनिक शिक्षण पध्दती शिकावी यासाठी यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. नुकतीच गुळवंची येथील जि.प.शाळा डिजिटल करून वेगळेपण जपले आहे.
शेगाव मतदार संघातील सर्वाधिंक कामे सुरू आहेत.सर्व स्तरावर वेगवेगळे उपक्रम शासनाच्या माध्यमातून राबविले जात आहेत. आता डिजिटल इंडियाचे तोडीची जिल्हा परिषद शाळा अॅड.जाधव यांच्या प्रयत्नातून शेगाव परिसरात आकारास येत आहेत.
गुळवंची येथील जि.प.शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्ञी यांची जंयती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळेला बहुउद्देशीय डिजिटल प्रोजेक्टर मिळवून दिला आहे.
स्नेहलता जाधव म्हणाल्या,सध्या भारतीची जागतिक ओळख निर्माण झाली आहे. सगळीकडे डिजिटल इंडियाचा बोलबाला आहे.त्यात तालुका मागे राहता कामा नये,यासाठी लोकप्रतिनिधीनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मी माझ्या मतदार संघातील शैक्षणिक क्षेत्र दर्जेदार करण्यासाठी प्रयत्नशील अाहे.आमदार विलासराव जगताप यांच्या माध्यमातून यापुढे शासनाच्या योजना आणून मतदार संघाचा नावलौकिक करण्याचा संकल्प सौ.जाधव यांनी व्यक्त केला.
यावेळी संरपच खटके,उपसंरपच नवनाथ पवार,बाबासाहेब सरगर,शाळा समितीचे माने तंटामुक्तीचे विलास पाटील, मुख्याध्यापक कोळी सर उपस्थित होते. सुत्रसंचालन दीपक जाधव यांनी तर आभार मुख्याध्यापक कोळी यांनी मानले.

गुळवंची ता.जत येथील कार्यक्रमात बोलताना अॅड.प्रभाकर जाधव व मान्यवर

Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.