डफळापूरच्या विद्यार्थीनीची सांगलीत आत्महत्या

0

वालचंद अभिंयात्रिंकी कॉलेजमधील वसतीगृहात फँनला ओढणीची गळपास

सांगली : सांगली विश्रामबाग येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील अक्षता प्रवीण कोष्टी (वय 18, रा. गुरुवार पेठ, डफळापूर, ता. जत) या विद्यार्थीनीने मुलींच्या वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली. घटनेची विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद आहे.डफळापूर येथील प्रसिध्द व्यापारी प्रविण कोष्ठी यांची अक्षता दोन नंबरची मुलगी होती.तिचा अशा अचानक आत्महत्येने हळहळ व्यक्त होत आहे.

अक्षता प्रवीण कोष्टी वालचंद महाविद्यालयात स्थापत्य अभियंता पद्विकेच्या पहिल्या वर्षात शिकत होती. ती महाविद्यालयातील वसतीगृहात राहत होती. तिच्या खोलीत आणखी सहा मुली राहतात. सोमवारी सकाळी सहापैकी काही मुली महाविद्यालयात, तरी काहीजणी क्लासला गेल्या होत्या. खोलीत अक्षता एकटीच होती. त्यावेळी तिने खोलीचा दरवाजा उघडा ठेऊन पंख्याला ओढणीने गळफास लाऊन घेतला.

Rate Card

साडेअकरा वाजता खोलीतील एक मुलगी क्लासमधून आली. खोलीचा दरवाजा उघडा असल्याने ती थेट आत गेली. त्यावेळी अक्षताचा मृतदेह गळफासाने लटकत असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार पाहून तिने आरडाओरड केली. तिच्या आवाजाने वसतिगृहातील मुलींनी धाव घेतली. महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापकही आले. पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा केला. शासकीय रुग्णालयात विच्छेदन तपासणी करण्यात आली. या घटनेचे वृत्त समजताच अक्षताचे आई-वडील व अन्य नातेवाईक दाखल रुग्णालयात दाखल झाले होते. सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.आत्महत्या करण्यापूर्वी अक्षताने मोबाईलवर गाणी लावली होती. तिने आत्महत्या केल्यानंतरही गाणी तशीच सुरु होती, असे तिच्या मैत्रिणीने पोलिसांना सांगितले. अक्षताच्या वडिलांचे डफळापुरात किराणा मालाचे मोठे दुकान आहे. पोलिसांनी तिच्या खोलीची झडती घेतली. तिने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहली आहे का, याचा शोध घेतला. पण काहीच सापडले नाही.

शोकाकूल वातावरणात अत्यसंस्कार
डफळापूरचे मनमिळावू व्यापारी प्रविण कोष्ठी यांची अक्षता मुलगी होती.गत वर्षी तिने दहावीपर्यतचे शिक्षण डफळापूर येथील राजे विजयसिंह डफळे विद्यालयात पुर्ण केले आहे. या वर्षी ती सांगली येथील वालचंद कॉलेज येथे अभिंयात्रिंकीचे शिक्षण घेते.तिचा मुत्यू मुळे डफळापूरात शोककळा पसरली आहे.सायकांळी शोकाकूल वातावरणात तिच्यावर डफळापूर या मुळ गावी अत्यसंस्कार करण्यात आले.
अक्षता कोष्टी 

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.