तिंकोडीत गांज्या शेतीवर छापा

0
3

उमदी,वार्ताहर: उमदी पोलिस ठाणे हद्दीतील तिकोंडी येथे बाजरीच्या पिकात लावलेल्या बेकायदा गांज्याच्या शेतीवर उमदी पोलिसांनी छापा टाकून 60 हाजार रूपयाचा गांज्याची झाडे जप्त करत प्रकाश उर्फ वंसत खंडू करे(वय-44) याला ताब्यात घेतले.

तिंकोडीतील करे यांने बाजरीच्या शेतात गांज्याची झाडे लावल्याची माहिती खबऱ्यांकडून पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे सा.पोलीस निरिक्षक भगवान शिंदे यांच्या पथकाने छापा टाकला.करे यांच्या बाजरीच्या शेतात 3 ते 4 फुट उंचीची 18 ओलसर झाडे सुमारे 12 वजन असलेली आढळून आली.त्यांची सध्याच्या बाजार भावाप्रमाणे 60 हाजार रूपये किंमत होते.सर्व झाडे जप्त करत करे याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. उपनिरक्षक श्री.दांडगे,पो.का.श्रीशैल वळसंग यांनी कारवाईत भाग घेतला.
दरम्यान सततच्या कारवाई नंतरही गांज्या लागवडी कमी होत नसल्याचे चित्र जत तालुक्यात आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here