विद्युत खांब डोक्यात पडून हमालाचा मुत्यू

0

जत,प्रतिनिधी: जत शहरातील कृषी सेवा केंद्रामध्ये माल उतरण्यासाठी आलेल्या ट्रक मागे घेताना विद्युत डांबाला धडक झाली.त्यात विद्युत डांब तुंटून ट्रकला साईट सांगणाऱ्या हमालाच्या अंगावर पडल्याने हमालाचा जागीच दुर्देवी मुत्यू झाला.राम वसंत सरगर(वय-35,रा.वाषाण)असे हमालाचे नाव आहे.घटना सोमवारी सकाळी 10 वाजता घडली. याबाबत बाबासाहेब सरगर यांनी जत पोलिसात फिर्याद दिली.

Rate Card

अधिक माहिती अशी,हमाल राम कदम हे जत शहरात हमालीचे काम करतात.सोमवारी सकाळी ते शहरातील दत्त कॉलनीतील ऐश्वर्या कृषी सेवा केंद्राचा माल भरून आलेल्या ट्रकमधील माल उतरण्यासाठी आले होते. ट्रक चालक सुभाष कोळी गोडाऊनच्या दिशेने घेत होता.चालक कोळी यांना सरगर ट्रक मागे घेण्यासाठी दिशा सांगत होता.ट्रक मागे घेत असताना अचानक ट्रकने विद्युत कंपनीच्या डांबाला धडक दिली.त्यात डांब तुटून सरळ हमाल राम सरगर यांच्या डोक्यात पडला.त्यात सरगर यांचा जागीच मुत्यू झाला. दरम्यान घटनेनंतर तातडीने सरगर यांचा मृत्तदेह ग्रामीण रुग्णालयांत आणण्यात आला. त्यांच्या मृत्तदेहावर रात्री उशिराने शवविच्छेदन करण्यात आले. राम सरगर यांच्या पश्चात आई,पत्नी,मुलगी,मुलगा असा परिवार आहे. राम हेच घरचे कर्ते पुरूष होते.नियतीने त्यांच्यावर घाला घातला अाहे.त्यामुळे त्यांच्या कुंटुबीयांवर दुखाचा डोंगर उभा आहे. घटनेची जत पोलिसात नोंद झाली आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.