सभापती पदाला न्याय दिला : सौ.मंगल जमदाडे,कार्यभार उपसभापती यांच्याकडे सोपविला

0

जत,प्रतिनिधी: जत पंचायत समिती सभापती म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य गृहिणीला आमदार विलासराव जगताप यांनी संधी दिली.त्यां संधीचे सोने करत पदाचा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करत पदाला न्याय दिला.केलेल्या कामात मी समाधानी असल्याचे प्रतिपादन मावळत्या सभापती सौ.मंगल जमदाडे यांनी पत्रकार परिषदेत केले.
जमदाडे यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर पदभार उपसभापती कडे देण्यात आला.त्यावेळी जमदाडे बोलत होत्या.
सौ.जमदाडे म्हणाल्या की, गेल्या दीड वर्षाच्या कार्यकाळात अनेक प्रलंबित कामाना गती देऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले. प्रामुख्याने 75 गावाच्या नगारटेक पाणीपुरवठा योजनेस आमदार विलासराव जगताप व खासदार संजय पाटील यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे पाठपुरावा करून योजनेचा कृती आराखड्यात समावेश केला आहे.तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सर्व  विभागाची 22 टक्के पदे रिक्त पदाकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामविकास मंत्री मुंडे यांना निवेदन  देवून पदे भरण्याची मागणी केली होती. सभापती निवड झाल्यानंतर गत वर्षीच्या टंचाई काळात 89 गावे 500 वाड्या वस्त्याना टँकरने पाणीपुरवठा करत नागरिकांवा दिलासा दिला जात होता.तालुक्यातील गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला.जिल्हा परिषदेकडून जास्तीत जास्त निधी व योजना प्रभावीपणे  राबविल्या आहेत. माझ्या दीड वर्षाच्या काळात जत पंचायत समितीचे गटविकासाधिकारी सह सर्व अधिकारी व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांना  बरोबर घेऊन जिल्हा परिषद गटनिहाय बैठका घेत स्थानिक जनतेचे अडचणी जागेवर सोडवण्याचा प्रयत्न केला .यापुढेही सदस्य म्हणून चांगले काम करण्याची ग्वाही दिली मावळत्या सभापती जमदाडे यांनी दिली.पंचायत समितीच्या माध्यमातून पशुसंर्वधन,छोपावि,ग्रामपंचायत विभाग,डीआरडीए विभाग,समाज कल्याण विभागातून विविध कामे सुरु असल्याची माहिती दिली.यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे,प्रभारी सभापती शिवाजीराव शिंदे,पंचायत समिती सौ.श्रीदेवी जावीर ,पंचायत समिती सदस्य रविंद्र सावंत उपस्थित होते.

Rate Card

पंचायत समितीच्या सभापती सौ.मंगल जमदाडे यांनी दीड वर्षाच्या कालावधीत चांगली कामे केली आहेत. विरोधी गट मजबूत असताना सामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य देत काम केले.जमदाडे यांनी प्रभारी गटविकास अधिकारी,असतानाही दुय्यम अधिकारी, कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन काम करण्याची पध्दत प्रेरणादायी ठरणारी आहे.
जत,सभापती पदाचे कार्यभार दिल्यानंतर शिवाजी शिंदे यांचा सत्कार करताना मावळत्या सभापती मंगल जमदाडे,प्रकाश जमदाडे व मान्यवर

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.