धोकादायक विहिरीमुळे सोन्याळ-जाडरबोबलाद रस्ता खचला

0

सोन्याळ,वार्ताहर : सोन्याळ-जाडरबोबलाद या रस्ता लगतच्या पडक्या विहिरीमुळे धोकादायक बनला आहे. त्याच ठिकाणी रस्ता खचल्याने अपघातचे स्थिती निर्माण झाली आहे. संबधित विभागाने तातडीने विहिर मुजवावी व रस्ता करावी अशी मागणी होत आहे.
विजयपूर-पंढरपूर असा हा जवळचे अंतर असणारा मार्ग अाहे.या मार्गावर यत्नाळ,तिकोंडी,संख, अंकलगी ,सोन्याळ,जाडरबोबलाद,मारोळी,भुयार चिकलगी निंबोणी,भाळवणी,मंगळवेढा अशी महत्वाची गावे येतात.पंढरपूर व विजयपूर या ऐतिहासिक व धार्मिक महत्व असणाऱ्या शहरांना हा मार्ग जोडतो.त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे.
मार्गाला लागून अनेक पडक्या विहिरी आहेत.तेथे रस्ता कामा करताना संरक्षक भिंती बांधणे गरजेचे होते.मात्र संबधित विभागाच्या दुर्लक्षाचे ती कामे झाली नाहीत.परिणामी तेथील रस्ता दिवसेनदिंवस खचत असल्याने अपघात प्रणव ठिकाणे बनली आहेत. त्याचबरोबर रस्त्यावर अनेक खड्ड्याची मालिका तयार झाली आहे. तातडीने रस्ता दुरूस्ती करावा अशी मागणी होत आहे.

Rate Card

सोन्याळ-जाड्डरबोबलाद रस्ता धोकादायक विहिरीमुळे खचल्याने अपघातचे ठिकाण बनले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.