दूध दराचा तिढा सुटला, दूध उत्पादकांना प्रतिलिटर 25 रुपये दर

0

Rate Card

नागपूर : दूध दराचा तिढा अखेर सुटला आहे. दुधाला 25 रुपये प्रतिलिटर भाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तर दूध संघांना लिटरमागे पाच रुपये अनुदान मिळणार आहे. 21 जुलैपासून हा निर्णय लागू होणार आहे.या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर महिन्याला 75 कोटींचा भार येणार आहे.सरकारकडून 5 रुपये प्रतिलिटर दूध संघाला देणार आहे आणि दूध संघांकडून हे पाच रुपये शेतकऱ्यांना मिळतील. प्रत्येक दूध संघाला या पाच रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना देणं बंधनकारक असेल.तसेच, विक्री व्यतिरिक्त जे दूध शिल्लक राहील आणि त्याची दूध भुकटी तयार केली जाईल, तेवढ्याच दुधाला सरकार दूध संघाना अनुदान दिले जाणार आहे.या संदर्भातील निवेदन दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी काही वेळापूर्वी विधानपरिषदेत सादर केलं.विधानसभा अध्यक्षांच्या दालनात दूध दरवाढीसंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्यासह काही दूध संघाचे प्रतिनिधीही उपस्थित होते. या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.”पिशवी बंद दुधासाठी कोणतेही अनुदान नाही. पिशवीबंद दूध वगळून दुधाला प्रति लिटर 5 रूपये अनुदान देणार आहोत. मात्र अनुदान दूध पुरवठा करणारी संस्था किंवा रूपांतरण करणारी संस्था यापैकी एकालाच मिळेल.”, अशी माहिती खोतकरांनी दिली.जे दूध भुकटी उत्पादक 5 रुपये प्रति लिटर लाभ घेतील, त्यांना दूध भुकटी निर्यातीसाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळणार नाही, असेही खोतकर म्हणाले. तसेच, 21 जुलैपासून सहकारी आणि खासगी दूध संस्थांना 25 रुपये प्रति लिटर दर दिल्यास लाभ मिळेल, असेही ते म्हणाले.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.