जतेत दुध बंद अंदोलन चिघळले, दुधाचा टॅम्पो रोकला,रस्त्यावर दुध ओतले

0

 संकलन करणाऱ्या डेअऱ्यांवर शेतकऱ्यांची धाड

जत,प्रतिनिधी: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारलेल्या दुध बंद आंदोलनाला जत तालुक्यात चौथ्या दिवशी चिघळले, दुध वाहतूक करणारा टॅम्पो अडवून दुध रस्त्यावर ओतले.संकलन करणाऱ्या दुध डेअऱ्यांवर शेतकऱ्यांची धाड दुध संकलन न करण्याच्या सुचना देण्यात आल्या.मागण्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. आज तोडगा न निघाल्यास शेतकरी,कार्यक्रर्ते आक्रमक होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील सर्व ठिकाणचे संकलन बंद ठेवण्यात आले आहे.सुमारे लाखभर लिटर दुधाचा व्यवसाय ठप्प झाला आहे. तिसऱ्या दिवशीही दुधाला दरवाढ मिळाली अशा घोषणा देत उत्पादकांनी रस्त्यावर दुध ओतून तालुक्यातील अनेक गावात शासनाचा धोरणाचा निषेध केला. व दूध दरवाढ मिळावी म्हणून मागणी केली आहे.अंदोलन पुकारून चार दिवस झाले तरीही निर्णय घेत नसल्याने शेतकरी आक्रमक होत आहेत. जत तालुक्यात चौथ्या दिवशी पारे(ता.सांगोला)येथे दूध घेऊन जाणारा टेम्पो वायफळ (ता.जत)याठिकाणी रोखला व यातील दूध संतप्त कार्यकर्त्यानी रस्त्यावर ओतले. स्वाभिमानी  शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत तहसील कार्यालया समोर शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.व दूध दरवाढ व्हावी या मागणीचे निवेदन तहसीलदार अभिजित पाटील यांना दिले.
        बनाळी ,येळवी,खैराव ,निगडी खुर्द,सोरडी ,मेंढिगिरी, डोर्ली या गावात दूध आंदोलन वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करण्यात आले.दूध उत्पादक,शेतकऱ्यांनी संकलन केंद्रात पाठ फिरवली होती.काही दूध संकलन केंद्र वगळता दुध घेणे सुरुच होते. परंतु शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी दुध संकलन केंद्र बंद पाडले.
           तालुक्यातील राजारामबापू  दूध संघ ,वसंतदादा जिल्हा सहकारी  दूध संघ ,वारणा दूध संघ ,स्वराज्य इंडिया लिमिटेड दूध संघ,सजंयकाका दूध उत्पादक संघ ,बाबासाहेब देशमुख   दूध संघ ,प्रतिभा दूध संघ ,हॅटसन अॅग्रो दूध संघ   या दूध संकलन केंद्र व चिंलिग प्लॅट ने सुमारे दीड लाख लीटर दूधाचे संकलन केलेले नाही .या केंद्रातून सुमारे दीड लाख हून अधिक  दूध संकलन केले जाते.यात काही संकलन केंद्राने दूध संकलन केले.सकाळी या संकलन  केंद्रात शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यानी दुध न घेणेबाबत सुचना दिल्यामुळे वातावरण तणावग्रस्त बनले होते. बनाळी येथे रस्त्यावर दूध ओतले यावेळी  मिलिंद पाटील,अविनाश सावंत,आण्णासो कोडग,पतलू सावंत,सागर सावंत,प्रतिक सावंत यांच्या सह दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान शिल्लक दुध शेतकरी घरोघरी वाटत आहेत.शाळेतील मुलांनाही दुधाचो वाटप करण्यात येत आहे.

वायफळ (ता.जत) येथे टेम्पो रोखून त्यातील दूध रस्त्यावर ओतले.

Rate Card

Attachments area

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.