संख | बँक ऑफ महाराष्ट्रच्या संख शाखेच्या पिककर्ज मेळाव्यात 38 लाखाचे पिककर्ज वाटप |

0
4

संख,वार्ताहर : येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या वतीने पिक कर्ज मेळाव्यात कार्यक्षेत्रातील दहा गावातील 24 शेतकऱ्यांना 38 लाख रुपयाचे पिककर्ज वाटप पत्र देण्यात आले.

यावेळी संरपच सौ.मंगलताई पाटील,शाखाधिकारी आर.बी.अमिनभावी, प्रा.आर.बी.पाटील, भिवर्गीचे बेळेणी बिराजदार,बँकचे अधिकारी श्री.जैस्वाल,शेती अधिकारी श्री.जाधव,एस.एम.कांबळे उपस्थित होते. केंद्र शासनाच्या धोरणानुसार कार्यक्षेत्रातील गरजू शेतकऱ्यांनी पिक कर्ज वाटप करण्याच्या सुचना राष्ट्रीयकृत्त बँकांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार संख येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने हे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना शाखाधिकारी अमिनभावी म्हणाले,बँकेच्या अनेक योजना चांगल्या आहेत.कर्जपुरवठा, ठेवी,विमा,अशा अनेक योजना थेट लाभार्थ्यांना पोहचविण्यासाठी आमचा प्रयत्न असतो.पारदर्शी व व्यवस्थित हप्ते भरून शेतकरी, व्यापारी यांनी बँकेचा नावलौकिक राखावा.बँकेकडून दिल्या जाणाऱ्या पिककर्ज,मुदत कर्ज,व्याज,हप्ते परतावा,पिकविमा यांचे फायदे यांची माहिती दिली. बँकेत येणाऱ्या प्रत्येक खातेदार,ठेवी व कर्जदारांच्या प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असतो.शेतकरी,व्यापारी,सर्वांना कर्जपुरवठा दिला जात आहे. कर्जे भरण्याचे काम कर्जदारांनी करावे असेही शेवटी अमिनभावी यांनी सांगितले.
कार्यक्रमाचा समारोप प्रा.बि.आर.पाटील यांनी केला.यावेळी बँकेचे खातेदार उपस्थित होते.

संख येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या पिककर्ज मेळाव्यात शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप करतांना संरपच सौ.मंगलताई पाटील व मान्यवर

Attachments area

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here