संख | बलात्कार, खून प्रकरणातील आणखी एका सशयिंतास अटक |

0

संख,वार्ताहर: संख(ता.जत)येथील एका 19 वर्षीय तरूणीवर बलात्कार करून खून केल्या प्रकरणातील मुख्य सशिंयत आरोपीला मदत केलेल्या त्यांचा मित्र सशयिंत म्हणून बसवराज मल्लिकार्जून बिराजदार (वय-35)याला पोलिसांनी संख येथून अटक केली आहे. या प्रकरणातील हा दुसरा सशयिंत आरोपी आहे.त्याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 23 जुलै पर्यत पोलिस कोठडीत सुनावली आहे. संख पासून जाणाऱ्या जुन्या करजगी रोडवर वस्ती असणाऱ्या एका 19 वर्षीय तरूणीवर घरात कोन नसल्याचा फायदा घेत संशियत आरोपीनी तिला ऊसाच्या शेतात ओढत नेहत बलात्कार करून खून केला होता.यातिल अटक केलेल्या मुख्य सशयिंत आरोपी श्रीशैल दाशाळ यांने बलात्कार करून खून केल्याची कबूली दिली आहे.या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी व तपास योग्य व्हावा या मागणीसाठी बंद पुकारण्यात आला होता.त्यात अन्य आरोपी असण्याची शक्यता अंदोलकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे पोलिसावर दबाव वाढला होता.दरम्यान दाशाळ याला कोणीकोणी मदत केली यांचा तपास पोलिस करत होते.बलात्कार व खून केल्यानंतर आरोपी श्रीशैल दाशाळ याला संख मधून पुणे येथे पळून जाण्यासाठी वाहनाने गुड्डापूर पर्यत जाण्यास मदत केल्याप्रकरणी बसवराज बिरादार याला अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर संशियत आरोपी श्रीशैल दाशाळ याला बिराजदार हा गुड्डापूर येथे सोडून संखला परत आला होता. दासाळ घटनेच्या रात्री गुड्डापूर येथे मुक्कामास होता.दुसऱ्या दिवशी त्याने पुण्याला पळ काढला होता. दरम्यान मुख्य सशयिंत आरोपीला मदत केल्याचा ठपका ठेवत बिराजदार यांला पोलिसानी अटक केली आहे.

Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.