जत,प्रतिनिधी: बेळोंडगी,हळ्ळी,व बालगाव येथे तीव्र पाणी टंचाई आहे.अंकलगी ता.जत येथील तलावातून पाणी अशी मागणी तिन्ही गावातील संरपच,शाळेच्या मुख्याध्यापकांनी केली आहे. मात्र अंकलगीतील नागरिंकानी विरोध केल्याने जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्यास नकार दिला आहे.
वास्तविक पाहता पिण्यासाठी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी तिन्ही गावातील नागरिकांनी केली आहे. नागरिक,शाळकरी मुंलाचेही पाण्यासाठी हाल होत आहे. तलावात सध्या पाणी साठाही मोठ्या प्रमाणात आहे.त्याशिवाय पाणीपट्टी भरण्यास या तिन्ही गावातील नागरिंक तयार आहेत.संबधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करावी,सध्याचे पाणी वाया जात आहे. जिथे तीव्र पाणी टंचाई आहे.त्यांना पाणी देण्यात यावे अशी मागणी सोमनिंग बोरामणी यांनी केली आहे. त्यांनी पाणी मागणीचे तिन्ही गावच्या संरपच, शाळेच्या मुख्याध्यापकांचे पत्र संबधित विभागाकडे दिले आहे.





