माडग्याळ | अर्धे गाव आजाराने त्रस्त |

0

माडग्याळ,वार्ताहर: माडग्याळ ता.जत येथे विविध आजारांची साथ आली आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे साचलेले साडपांणी व वातावरणातील बदलामुळे अर्धे गाव विविध आजाराने ग्रस्त झाले आहे. अनेकजण विविध आजारावर उपचार घेत आहेत.
प्रांरभी पाण्यासाठी समस्या असलेल्या माडग्याह करांना पाणी टंचाईची सतत असतेच.त्याच बरोबर गावातील काही  पदाधिकाऱ्या अडमुठे भुमिकेमुळे गावच्या समस्येत वाढ होत आहे. सतत विकास कामांना खो घालण्याची पध्दत व बेदर्दी प्रशासन यामुळे गावात घाणीचे सामाज्र निर्माण झाले आहे.त्यामुळे साथीच्या आजारांने डोके वर काढले आहे.अंगदुखीं,थंडी ताप,मलेरिया,डेंगू,काविळ सारखे आजार वाढत आहेत.
गाव स्वच्छतेसाठी उपाययोजना नाहीत.त्यामुळे डांसाचे प्रमाण वाढले आहे.गटारीचे साडपांण्याचे प्रवाह अडले आहेत.त्यामुळे अनेक भागात दुर्गंधीने नागरिंक व्याकूळ झाले आहेत. आजारावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.