उमदी | फेसाटीकार नवनाथ गोरेचां सत्कार |

0

उमदी,वार्ताहर:साहित्य अकादमीचा युवा साहित्यक पुरस्कार प्राप्त “फेसाटी” या कादंबरीचे लेखक नवनाथ गोरे यांचा सत्कार उमदी पोलिस ठाणे व सामाजिक संघटनाच्या वतीने करण्यात आला.
उमदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक भगवान शिंदे,पोलिस उपनिरक्षक प्रविण संपागे यांनी गोरे यांचा पोलिस ठाण्यात सत्कार केला.उमदी सर्व सेवा शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने प्रशाळेत गोरेचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना लेखक नवनाथ गोरे म्हणाले , लेखक हा वारसा कोणालाही नसतो त्याच्या अंतर आत्म्यातून आलेला आशय कागदावर उमटवणे म्हणजे लेखक तयार होतो. तसेच मी माझ्या कांदबरीत मी माझ्या बालपणापासुन ते आजतागयत माझ्या जीनवनातील सर्व प्रसंग लिहीत माझ्या मनातील ओझे कमी केले व त्यातुनच फेसाटीचा जन्म झाला. ही कांदबरी तयार झाली. मला आज माझं घरचे ,गावचे , तालुक्याचे नाव देशपातळीवर नेले यांचा मला अभिमान आहे. तसेच विद्यार्थी दशेत असताना आलेल्या अपयशाने खचून न जाता भविष्यातील वेध घेत आपला प्रयत्न चालू ठेवला पाहिजे तरचं यशोशिखर गाठता येत असे नवनाथ गोरे म्हणाले.
         युवा नेते संजय अण्णा तेली युवा मंच,क्रांती युवा मंच, मलकारसिद्ध मंदिर यांच्या वतीने उमदी परिसरात गोरेचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी मुख्याध्यापक मनोहर चव्हाण,सरपंच संजय चौके,विविध नेते,शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Rate Card

उमदीत फेसाटीकार नवनाथ गोरेचां पोलिस ठाणे,विविध संघटना वतीने सत्कार करण्यात आला.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.