खंडनाळ | वाळू तस्करी करणारा टॅक्टर पकडला |

0

तहसिलदार नागेश गायकवाड यांच्या पथकाची कारवाई : साडेतीन लाख दंड

संख,वार्ताहर : खंडनाळ (ता.जत)येथील भोर नदी पात्रात अट्टल वाळू तस्कर आप्पा थोरात कडून सुरू असलेल्या वाळू तस्करी टँक्ट्ररवर संख अप्पर तहसिल कार्यालयाच्या पथकाने छापा मारला.तस्करी करत असलेला ट्रॅक्टर तस्करांनी तसाच पळवून काही अंतरावर पलटी केला.मात्र पथकाने पाठलाग करत टॅक्टर पकडत धाडसी कारवाई केली.
पुर्व भागातील भोर नदी पात्रातील वाळू तस्करी रोकण्यासाठी पथके गस्त घालत आहेत.शनिवारी खंडनाळ हद्दीतील नदीपात्रा बिगर नंबर प्लेटच्या टँक्टरद्वारे वाळू काढताना तस्कर आढळले.पथक येताना दिसताच चालकांने टॅक्टर तसाच पळविला.काही अंतरावर जाऊन टँक्टर पलटी करून वाळू ओतली.पथकाने तसाच पाठलाग केल्याने चालकांनी ट्रँक्टर सोडून पलायन केले.पथकाने ट्रँक्टर जप्त करून उमदी पोलिसाच्या ताब्यात दिला आहे. गेल्या अनेक दिवसापासून या भागातील वाळू तस्कर पथकाला गुंगारा देऊन वाळू तस्करी करत होते.यावेळी मात्र तहसिलदार नागेश गायकवाड यांच्या पथकाने सापळा लावून वाळू तस्करी करणारे वाहन पकडले आहे. वाळू तस्करांनी 5 ब्रास अऩधिकृत्त वाळू उत्खनन केले आहे. त्याला 3 लाख 50 हाजार रुपयाच्या दंडाची कारवाई प्रस्तावित केली आहे.वाळू रोकण्यासाठी नेमलेल्या पथकांने मोठ्या धाडसाने ही कारवाई केली आहे. प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार नागेश गायकवाड, तलाठी शंकर बागेळी,पोलिस कॉन्स्टेबल चव्हाण, रुपेश गोपड,चन्नाप्पा भोसले,सुरेश पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.

Rate Card

खंडनाळ ता.जत येथे वाळूतस्करी करणारा पाठलाग करून पकडलेला टँक्टर

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.