प्रमुख मार्गावरील अतिक्रमे हटविणार जत नगरपरिषदेत महत्वपुर्ण ठराव

0

Rate Card

भाजी मंडईचेही स्थंलातर 

जत,प्रतिनिधी: जत शहरातील प्रमुख मार्गावरील अतिक्रमे काढून शहराची वाहतूक कोंडीतून मुक्ती करण्याचा महत्वपुर्ण ठराव नगरपरीषदेच्या मासिक सभेत झाला.
जत नगरपरीषदेची मासिक सभा नगराध्यक्षाच्या शुभांगी बन्नेणवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
     शहरातील सर्व विषयावर बैठकीत चर्चा झाली.शांततेत संवाद साधला.
त्यात जत शहरातील वाहतूक कोंडी संपविण्यासाठी बाजार पेठेतील भाजीमंडई वेगळ्या जागेत हलविण्याचे ठरले. त्याचबरोबर शहरातील कचरा उचलण्यासाठी नेमलेल्या ठेका रद्द करून नगरपरीषदेच्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करावी असाही ठराव घेण्यात आला. शहरात वाढलेली झुडपे काढून,डांसाची उत्पती रोकण्यासाठी औषध फवारणी करावी असे मुद्दे नगरसेवकांनी मांडले. शहरात चिकनगुण्या,मलेरीया,सारखे आजार वाढले आहेत.त्यामुळे उपाययोजना कराव्यात असे विषय समोर आले.त्यावर तातडीने औषध फवारणी करण्यात येईल.डांसाची उत्पती स्थाने नष्ठ करण्यासाठी नियोजन करण्याचे ठरले.सर्व विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सभा शांततेत पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार,गटनेते पंट्टू गंवडी,विजय ताड,स्वप्निल शिंदे, लक्ष्मण एडके,विजय ताड_प्रकाश माने,उमेश सावंत , प्रमोद हिरवे,भूपेंद्र कांबळे,संतोष कोळी व इतर नगरसेवक उपस्थित होते. तहसिलदार तथा मुख्याधिकारी अभिजित पाटील व पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यानी यावेळी मार्गदर्शन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.