वळसंग सरपंचावर दुसऱ्यांदा अविश्वास ठराव मंजूर : चव्हाण गटाचा संरपच होणार

0

वळसंग,वार्ताहर : वळसंग ग्रामपंचायतीवर गत निवडणूकीत काॅग्रेसच्या चव्हाण गट आणि भाजप पुजारी गटाच्या अटी-तटाच्या राजकारणात चव्हाण गट 9 पैकी 6 जागा व भाजपच्या पुजारी गटच्या 9 पैकी 3 जागा मिळाल्या होत्या.
बहुमत काँग्रेसच्या गटाकडे मिळालं परंतु आरक्षित सरपंच पदासाठी असणारा उमेदवार मात्र काँग्रेस कडे नसल्याने भाजपच्या सदाशिव कांबळे यांच्याकडे सरपंच पद देण्यात आले.दरम्यान संरपच वेगळ्या गटाचा व बहुमत दुसऱ्या गटाकडे यामुळे विकास कामे करण्यात अडचणी येत होते.त्यामुळे चव्हाण गटाच्या एक सदस्यांन राजीनामा दिला होता.तेथे नुकत्याच झालेल्या पोटनिवडणूकीत कॉग्रेसच्या चव्हाण गटाचा आरक्षित उमेदवार विजयी झाला आहे. सध्याचे भाजप संरपच यांच्यावर बहुमतांच्या जोरावर अविश्वास ठराव आणून मंजूर केला आहे. त्यामुळे आता चव्हाण गटाचा संरपच होणार आहे.सत्तेच्या मुख्य पदासाहित कारभारावर पुन्हा बहुमतासह आपलं नाव कोरल. यावेळी तहसिलदार अभिजित पाटील, ग्रामसेविका मस्के, उपसरपंच मनीष चव्हाण , सदस्य यल्लव्वा कोळी, बापू चव्हाण, मालन मुचंडी, नकुसा बंडगर आणि नूतन सदस्य चंद्रभागा कांबळे आणि पुजारी गटाचे सदाशिव कांबळे व इतर सदस्य याबरोबर अॅड.रेऊर,संतोष बिरादार, रमेश पाटील, उमेश बंडगर,विठ्ठल पुजारी आदी उपस्थित होते

Rate Card

गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठीच हा निर्णय: उपसरपंच मनीष चव्हाण
आतापर्यंत गावात झालेल्या राजकीय वैमनस्य यातून वेगवेगळ्या हालचाली आणि निर्णय गावाने झेलले आहेत.यात विकास करण्यासाठी आमच्याकडे असलेल्या कल्पनांना विरोधी पक्षाने केलेल्या विरोध आणि सत्ता आणि कारभार हाती असून जनतेच्या अपेक्षा पूर्ण न केल्यामुळे चव्हाण गटाने दुसऱ्यांदा अविश्वास ठरावाच्या या निर्णय घेतला.यापुढे जनतेला अपेक्षित असणाऱ्या विकास करू असे यावेळी उपसरपंच मनीष चव्हाण यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.