जत | तपासणीविना धावताहेत स्कूल बस |

0

जत,प्रतिनिधी: संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या बसला अपघात झाल्यानंतर स्कूल बसच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा येथे चर्चेत आला आहे. प्रथम दंडात्मक, जप्ती आणि न्यायालयीन कारवाई अशा कारवाईच्या बडग्यानंतरही शहरासह जत तालुक्यात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सुमारे बसेस अवैधरित्या तपासणीविना फिरत आहेत. या बसेसवर कडक कारवाई करण्याची मोहीम प्रादेशिक परिवहन विभागाने सुरू करण्याची गरज आहे.
कोल्हापूर -सांगली राज्यमार्गावर चोकाक येथे मंगळवारी कंटेनर आणि स्कुलबसची धडक होवून 3 जण ठार तर 24 जण जखमी झाले होते. घोडावत इंटरनॅशनल स्कूल बसला झालेल्या या अपघातानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने तातडीने बेकायदा विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम सुरू केली. मात्र ही मोहिम सांगली शहरापर्यत मर्यादीत राहीली आहे.जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात इंग्लिश स्कूलचे फॅड निर्माण झाले आहे. अशा स्कूलना विद्यार्थी ने-आण करण्यासाठी नियम बाह्य बस,खाजगी वाहनाचा वापर होत असल्याने विद्यार्थांचा जिव धोक्यात आहे.

Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.