जतेत ईद निमित्त “ईद ए मीलन” कार्यक्रम उत्साहात संपन्न |

0

जत,प्रतिनिधी : येथील टिपू सुलतान सामाजिक संघटनेच्या वतीने ईद ए मीलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
ईद निमित्त आयोजित या कार्यक्रमात सिरकुंबाचे वाटप करण्यात आले.मुस्लिम बांधवाचा
संयम, सामंजस्य व त्याग याची शिकवण देणार्‍या रमजान महिन्याचा शेवट रमजान ईदने साजरा होतो.शहरातील हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रित येत गुण्यागोंविदाने हा कार्यक्रम साजरा करतात.यंदा ईद निमित्त शहरातील लोंखडी पुलाजवळील भाजीमंडईत शिरखुर्माचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमास कॉग्रेस नेते विक्रम सांवत,भाजपचे नेते डॉ.रविंद्र आरळी,नाना शिंदे,डिवायएसपी नागनाथ वाकुडे, पोलिस निरिक्षक राजू तहसिलदार आदी मान्यवरांनी यात सहभाग घेतला.
हाजी रशीद पटाईत,
मुसाभाई गवंडी,मकसूदभाई नगारजी,इकबाल गंवडी, हाजी बंदेनवाज पटाईत,मुन्नाभाई पखाली, सद्दाम अत्तार जारीकभाई आपराज,बंटी कटकटी व शेर ए हिंद टिपू सुलतान संघचनेच्या कार्यकर्त्यांनी नियोजन केले.

Rate Card

जत: ईद निमित्त आयोजित ईद ए मीलन कार्यक्रमात मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देताना कॉग्रेस नेते विक्रम सांवत व मान्यवर

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.