मुंचडीत | दोन महिलांचा शेततलावात बुडून मुत्यू |

0

कपडे धुण्यासाठी गेलेल्या काकू-पुतणीवर नियतीचा घाला : चार दिवसावर लग्न येऊन ठेपलेल्या पुतणीचा मुत्यू

Rate Card

जत,प्रतिनिधी: मुंचडी ता.जत येथे कपडे धुण्यासाठी  गेलेल्या काकू-पुतणीचा एकमेकींना वाचविताना पाय घसरल्याने शेततलावात बुडून मुत्यू झाला. संगिता गुरूनिंग गोठे (वय-30),पुजा सिध्दाप्पा गोठे(वय-20) असे मयत काकू-पुतणीची नावे आहेत. सोमवारी दोनच्या सुमारास दुर्घटना घडली. याबाबतची फिर्याद दयानंद चंनगोडा बिराजदार यांनी जत पोलिसात दिली.
पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी, मुंचडी गावाच्या कडेला गोठे वस्ती येथे राहणाऱ्या गोठे कुटुंबीयातील पुजा गोठे हिचा विवाह रावळगुंडवाडी येथे ता.22 जुनला होणार होता.विवाहाची घरात धामधुम सुरू होती.सोमवारी घरातील सर्वजण पुजाच्या लग्नाचा बस्ता काढण्यासाठी जतला आले होते.घरात संगिता व पुजा ह्या काकू-पुतणी दोघीच होत्या,सकाळी जेवण आटपुन,दुपारी दोनच्या सुमारास गोठे यांच्या शेतीतील शेततलावात दरदिवशीप्रमाणे दुपारी दोनच्या सुमारास संगिता व पुजा कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.दरम्यान कपडे धुण्यासाठी पाणी काढत असताना संगिताचा पाय घसरल्याने ती शेततलावात बुडू लागल्याने पुजाने संगिताला हाताला धरून वर्ती काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पुजाचाही पाय घसरल्याने तीही शेततलावात पडली.दोघींनाही पोहता येत नसल्याने दोघी बुडाल्या.दरम्यान घरालगतचे दयानंद चंनगोडा बिराजदार यांना शेततलावात दोघी मयत स्थितीत पडल्याच्या निदर्शनास आले.त्यांनी गोठे यांच्या नातेवाईक व पोलिसांना कळविले.पोलिसांनी दोन्ही मृतदेह तलावाबाहेर काढून जत येथील ग्रामीण रुग्णालयांत शवविच्छेदन करून कुंटूबियाच्या ताब्यात दिले.तत्पुर्वी मयत काकू-पुतणीच्या रुग्णालयांत नातेवाईकांनी हबरडा फोडला होता. अगदी लग्नघडी समिप आली असताना पुजा व तिच्या काकूचा दुर्दैवी अंत उपस्थितांना हुंदका देणारा होता.नियतीच्या अजब कारभारमुळे पुजा व तिचा भावी पतीचे कुंटूबियाचे दुख:न संपणारे आहे.जत पोलिसात गुन्हाची नोंद झाली आहे. अधिक तपास पिएसआय राजू तहसिलदार करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.