जत | रमजान मानवता, प्रेमाचे प्रतिक आमदार विलासराव जगताप:जत पोलिसांकडून इफ्तार पार्टी |

0

जत,प्रतिनिधी:रमजानचा पवित्र महिना प्रेम,  सहिष्णुता व मानवेतेचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन आमदार विलासराव जगताप यांनी केले.
जत पोलीस ठाण्याच्यावतिने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस उपअधिक्षक नागनाथ वाकुडे, पोलिस निरिक्षक राजू ताशीलदार,रणजिंत गुंडरे,श्री.गढवे बंदेनवाज पटाईत, रशिद पटाईत, सलीम गवंडी,  महबूब गवंडीपापा नदाफ, शफीक इनामदार आदी उपस्थित होते.
ताशीलदार म्हणाले, भारतीय संविधानामुळे देशात सर्वधर्म समभावाचे वातावरण आहे. सर्वच धार्मिक सणामध्ये पोलीस यंत्रणा सक्रीय असते,  रमजान सणानिमित्त पोलीस दरवर्षी इफ्तारचे आयोजन करित असते.रमजान महिन्यात मुस्लिम बांधवासाठी इप्तार पार्टीचे आयोजन जत पोलिसाकडून दरवर्षी करण्यात येत. रोजा सोडविण्यासाठी यावेळी मुस्लिम बांधवासाठी फळे व मिठाईचे वाटप करण्यात आले.यावेळी मुस्लिम समाजातील सर्व संघटनाचे पदाधिकारी व सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Rate Card

जत येथील इप्तार पार्टीत उपस्थित आमदार विलासराव जगताप, डिवायएसपी नागनाथ वाकुडे, पोलिस निरिक्षक राजू तहसिलदार व पोलिस ठाण्याचे अधिकारी,मुस्लिम बांधव

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.