डफळापूर | प्रा.आ.केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभार विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार |

0

डफळापूर, वार्ताहर : डफळापूर ता.जत येथील आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांचे हाल होत आहे. कर्मचारी रुग्णाची हेळसाड करतात.त्यामुळे रुग्णांची जिव टांगणीला लागला असल्याची तक्रार सचिन छत्रे यांनी जिल्हाधिकारी,जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य सभापती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,माझ्यासह अनेक रुग्णाच्या नातेवाईकांना कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार पणाचा फटका बसला आहे. त्यामुळे उपचाराविना आजारी रुग्ण एकतर माघारी न्यावे लागते किंवा खाजगी दवाखान्यात उपचार करावे लागत आहे. छत्रे यांनी 13 जूनला मुलगा अभिषेकला खेळताना गंभीर जखम झाली होती.त्याला त्याच दिवसी दीड वाजता उपचार्थ डफळापूर प्रा.आ.केंद्रात आणले असता अभिषेक रक्तस्ञाव होत असतानाही उपस्थित कर्मचाऱ्यांनी डॉक्टर नाहीत,आता येणार नाहीत.म्हणत कोणत्याही उपचार न करता परत पाठविले.परिणामी जखमी मुलांला खाजगी दवाखान्यात उपचार करावे लागले. सर्व सुविद्या असतानासुद्धा कर्मचारी असे उध्दटपणे वागतात कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. सतत असे प्रकार घडत असून रुग्णांचे हाल होत असल्याने केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या सखोल चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी अर्जात केली आहे. आमच्या अर्जाचा विचार न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा छत्रे यांनी दिला आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.