जत | कोकरेवस्ती(बनाळी)मध्ये अंगणवाडी इमारत कोसळली! सुदैवाने बालके बचावली, साहित्याचे नुकसान | www.sankettimes.com

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील बनाळी गावात कोकरेवस्ती येथील अंगणवाडीची इमारत कोसळून साहित्याचे नुकसान झाले आहे. मात्र अंगणवाडीतील बालकांना सुदैवाने कोणताही धोका पोहोचला नाही.
    याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बनाळी गावात असणाऱ्या कोकरेवस्तीवर डिसेंबर 2008 मध्ये अंगणवाडी चालू झाली. मात्र यासाठी शासनाकडे इमारत नसल्याने राजाराम कोकरे यांनी स्वतःच्या मालकीची इमारत, टेबल, खुर्च्या व कपाटासह अंगणवाडीसाठी दिली. गेल्या दहा वर्षात या इमारतीचे भाडे मिळावे म्हणून अंगणवाडी शिक्षकाने प्रयत्न केले मात्र याला लाल फितीच्या कारभारातून आण्णासाहेबांना यश आले नाही. अनेकवेळा या इमारतीची देखभाल येथील स्थानिकांनी स्वखर्चाने केली. नवी इमारत बांधणार म्हणून जुन्या इमारतीच्या भाड्याचा प्रस्ताव बाजूला सारून 2012 मध्ये पहिल्यांदा इमारत मंजूर झाली. मात्र या इमारतीच्या ठेकेदाराचे आणि अधिकाऱ्याचे टक्केवारीत वाजले. नेतेमंडळींनी पत्र्याची इमारत नको आपण स्लॅपची इमारत मंजूर करून आणतो असे आश्वासन देऊन नागरिकांना खुश केले आणि निवडणुका जिंकल्या.
       जिल्हा परिषदेत गेल्यावरही तीन- चार वर्षे आश्वासन देत शेवटी स्लॅपची इमारत मंजूर झाली. लाखो रुपये खर्चाची तरतूद असणाऱ्या इमारतीचे टेंडर मंजूर झाले. पण टेंडर मंजूर झालेला नेता एका पक्षाचा आणि ग्रामपंचायतीची सत्ता दुसऱ्या पक्षाची अशी स्थिती झाल्याने ठरावाच्या अाडकाठीत पुन्हा टक्केवारीची चर्चा रंगली आणि इमारत कागदावरच राहिली. शेवटी गेल्यावर्षापासून ग्रामपंचायतीच्या मागे लागून पत्रातरी झाकून द्या. किरकोळ दुरुस्त्या करा असा शिक्षकांचा आणि पालकांचा तगादा लागल्यावर अर्ध्या भागावर पत्रे घालण्याचे इंस्टीमेट ग्रामसेवक अण्णासाहेबांनी तयार केल्याचे चार महिन्यापासून सांगितले जात होते. पावसाळ्यापूर्वी पत्रे झाकून मिळतील या आशेवर अंगणवाडी कर्मचारी होते.पण ते झाले नाही. गेल्या पंधरा दिवसापासुन जीव मुठीत धरून अंगणवाडीचे कर्मचारी आणि सुमारे पंचवीस बालके याच इमारतीच्या आश्रयाने शिकत होते. ज्या दिवसाची भीती होती तो दिवस आज उजाडला आणि अचानक अंगणवाडीचा पुढचा भाग खाली आला. शिक्षकेच्या सावधानतेमुळे अनेक बालके पळाली तर एका बालकाच्या अत्यंत जवळच इमारतीची मोठाली तुळई पडली. सुदैवाने त्याला कोणतीच इजा पोहोचली नाही.मात्र या घटनेनंतर भयभीत झालेल्या पालकांनी प्रशासना विषयी उद्रेक होत आहे. तातडीने नविन इमारत बांधावी अशी मागणी होत आहे.
सध्या शाळेतील काही साहित्य डॉ.श्रीकांत कोकरे यांच्या घरी सुरक्षितेसाठी हलवण्यात आले तर अंगणवाडीतील मुलांनी धुळदेव मंदिरात ठाण मांडले आहे.

Rate Card

बनाळीतील कोकरेवस्ती येथील अंगनवाडीची इमारात कोसळूंन दुर्घटना होता होता वाचली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.