डफळापूर, वार्ताहर: खलाटी, जिरग्याळ, एंकूडी मिरवाड परिसराला बुधवारी सायकांळी वादळाचा तडाखा बसला.वादळी वाऱ्यासह आलेल्या पाऊसाने हाहाकार माजवला. वादळात गाईचे गोठे, घराचे पत्रे,विजेचे खांब,डिपी पडल्या आहेत.वादळी वाऱ्यांने सुमारे 50 लाखाचे नुकसान झाल्याचं वृत्त आहे.
बुधवारी सायकांळी वादळी वाऱ्यासह डफळापूर, खलाटी, जिरग्याळ पट्ट्यात दणका बसला आहे. मोठ्या प्रमाणात झाडे कोसळले आहेत. घराचे पत्रे उडाल्याने अनेक कुंटुबिये उघड्यावर आली आहेत. जिरग्याळ येथे विजेच्या दोन डिपी कोसळल्याने विज पुरवठा खंडीत झाला आहे.काही ठिकाणचे डांबही पडले आहेत. खलाटी, जिरग्याळला वादळी वाऱ्यांचा मोठा फटका बसला आहे. सुमारे 50 घराचे नुकसान झाले आहे.नुकसानीत खलाटी येथील परशूराम विठोबा कोळी यांचे ग्रीन हाऊसचे मोठे नुकसान झाले. ग्रीन हाऊसचे रोपे,वरचे,साईटचे छत,रोपाचे,सुमारे 5 लाखाचे नुकसान झाले.विठ्ठल रामचंद्र चव्हाण सिमेंट पत्र्याचे नुकसान झाले. आक्कूबाई बाळू कोळी पञ्याचे शेडचे 65 हाजाराचे,श्रीनिवास बाबासो कोळी याच्या पत्रा शेडचे 4 हाजार,राजू कोळी यांच्या आरके ढाब्याच्या पत्रा शेडवर झाड कोसळूंन भिंतीचे नुकसान झाले.
याशिवाय अनेक घराचे पत्रे उडाले आहेत.
अर्ध्या तासात पंचनामे सुरू
डफळापूर मंडल कार्यालयात वादळी वाऱ्यांमुळे नुकसान झाल्याचे माहिती मिळताच मंडल अधिकारी एस.एम.मुलाणी,तलाठी ए.ए.भोसले,कोतवाल विक्रम हाताळे यांनी तातडीने खलाटी गाठत अर्ध्या तासात पंचनामे सुरू केले आहे. सायकांळी साडेपाच पासून सुरू केलेले पंचनामे अंधार पडताच थांबविण्यात आले आहेत.आजपासून उर्वरित पंचनामे करण्यात येणार आहेत. सायकांळी सुमारे सात घराचे पंचनामे झाले आहेत.नुकसानीचा आकडा सुमारे 50 लाखाच्या वर जाणार आहे.
- रस्त्यावर पाणी आल्याने अपघातप्रणव क्षेत्रे बनली.
- डफळापूर-जत या राज्यमहामार्गावर मोबाईल कंपन्याच्या खोदणीची चर कशीही मुजविल्याने गटारीचे आस्तित्व संपले आहे.त्याशिवाय डफळापूर गाव भाग,जत रोडवर गटारी गडप झाल्याने पावसाचे पाणी तब्बल अर्धा तास पुर्णत:रस्त्यावर उभे राहिले होते.मोठ्या नाला झाल्यासारखी रस्त्याची स्थिती झाली होती.दुचाकी,लहान वाहने चालविणे काहीकाळ शक्य नव्हते. तसेच खलाटी मोबाईल टॉवरजवळ गटारी मोबाईल चरीमुळे भरली आहे.त्यामुळे नेमका वळणावर पाण्याचा डोह तयार होत आहे. गतवर्षी तीन वाहने या पाण्यामुळे पलटी झाली आहेत.तरीरी बांधकाम विभाग मु गिळून गप्प आहे.काही जिव गोल्यावर कदाचित जागा होईल असे काही नागरिकांना वाटते.
- डफळापूर: बुधवारी सायकांळी आलेल्या वादळी वाऱ्यांचा पाऊसाने मोठे नुकसान केले.खलाटी अनेक घराचे पत्रे उडाले आहेत. जत सांगली रस्त्यावर डफळापूर गावानजिक गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने असा मोठा नाला तयार झाला होता.








