उमदी | करजगी गांज्या प्रकरणातील एका आरोपीच्या मुशक्या आवळल्या | www.sankettimes.com

0
18

उमदी, वार्ताहर :करजगी ता.जत येथील गांज्या प्रकरणातील सशयिंत आरोपी महेश उर्फ पिंटू मल्लाप्पा पटनशेट्टी(वय-26,रा.करजगी) या उमदी पोलिसांनी कर्नाटकतील चडचण(ता.इंडी) येथून ताब्यात घेतले आहे.तालुक्यातील सर्वात गांज्याची मोठी कारवाई उमदी पोलिसांनी करजगीत केली होती.उमदी पोलिसात दाखल एनडीपीएस कलम 8(क),20(ब),22 अन्वये हा गुन्हा दाखल झाला आहे.
त्यातील सशयिंत आरोपी पट्टनशेटी बंन्धू फरार झाले होते.त्यांच्या पकडण्यासाठी पोलिसाची पथके वेगवेगळ्या ठिकाणी आरोपीचा शोध घेत होते.यातिल महेश पट्टनशेटी हा चडचण येथे असल्याची माहिती पथकाला लागली होती.मोठ्या शिताफीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आहे. हि कारवाई सा. पोलिस निरिक्षक भगवान शिंदे, उपनिरिक्षक प्रविण संपागे, पो.कॉ.सरगर,श्रीशैल वळसंग,पो.ना.हांडे यांनी केली आहे.

करजगी गांज्या प्रकरणातील एका आरोपीला उमदी पोलिसांनी चडचण येथून ताब्यात घेतले. पथकासह आरोपी.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here