वळसंग | सालेकिरीचे जवान अमर साळे यांच्यावर शोकाकूल वातावरणात अत्यसंस्कार नौदलात सेवा बजावताना अपघाती निधन

0

वळसंग,वार्ताहर:मौजे सालेकिरी येथील जवान अमर लक्ष्मण साळे हे विशाखा पट्टनम येथे नौदलात कार्यरत असताना 31 मे रोजी सेवा बजावत असताना रोड अपघातात वीरमरण आले. रविवारी सकाळी 8.00 वाजता जवान अमर यांचे मुळ गाव सालेगिरी येथे गावातून अंत्ययात्रा काढून जवान अमर यांना शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार उमाजीराव सनमडीकर, नायब तहसिलदार शेट्याप्पा घोळ,पोलिस निरिक्षक राजू तहसिलदार, जिल्हा सैनिक अधिकारी,नौदलाचे जवान प्रविण सुपेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात आई व एक भाऊ असा परिवार आहे.त्यांचे वडील लक्ष्मण दऱ्याप्पा साळे हे 20 फेब्रुवारी 2012 रोजी नौदलात देश सेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आले होते. तर त्यांचे आजोबा दऱ्याप्पा नाथा साळे हे सुद्धा नौदलात देशसेवा बजावलेले आहेत.त्यांचे भाऊ सुद्धा नौदलात सेवा बजावत आहेत. अशा अमरच्या तीन पिढ्या नौदलात कार्यरत होत्या.जवान अमरही नौदलात सेवा बजावत होते. 31 मे रोजी जवान अमरला वीरमरण आले. जवान अमरचा मृतदेह सालेकिरी या त्यांचा मुळ गावी रविवारी सकाळी आणण्यात आला.गावातून शोक फेरी काढून त्यांच्यावर शासकीय इतमामात अत्यसंस्कार करण्यात आले. यावे मोठे जनसमुदाय लोटला होता.

Rate Card

सालेकिरी ता.जत येथील जवान अमर साळे यांच्यावर शोकाकूल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.