जत | भल्या पहाटे डोंगरावर ग्रामस्थांची धडपड,मुख्यंमञ्यांच्या दौऱ्यांने वाढली ! | www.sankettimes.com

0

जत,का.प्रतिनिधी  : जानेवारी, फेब्रुवारी महिना आला की ओढे,नाले आटतात. साडेतीनशे, चारशे फुटावरील कुपनलिका कोरड्या पडतात. पाणीटंचाईमुळे गेल्या कित्येक वर्षांपासून टँकरशीही नाते दृढ झालेले. त्यामुळे पाणीटंचाईचे प्रचंड चटके सोसलेले जत तालुक्यातील अनेक गावातील नागरिक पाणी बचतीसाठी कमालीचे जागृत झाले. त्यातूनच गाव पाणीदार करण्यासाठी संपूर्ण ग्रामस्थ एकवटले आहेत. भल्या पहाटे ग्रामस्थ डोंगरावर जाऊन काम करीत आहेत.याला कारण ठरले आहे अभिनेता अमिर खान यांचे पाणी फाऊडेंश जतच्या 106 गावात पाणी फाऊडेंशचे तुफान आलायं.या तुफानाची दखल थेट मुख्यंमञी देवेंद्र फडणवीस यांनी घेत जत तालुक्यातील आंवढी व बागलवाडी येथे भेट देत ग्रामस्थांबरोबर श्रमदान करून उत्साह वाढविला आहे.त्यामुळे अखेच्या काही दिवसात शेकडो,हाजारो ग्रामस्थं डोंगरदऱ्यात श्रमदान करताना दिसत आहेत.
या जलसाक्षर चळवळीत सहभागी होण्यासाठी लहानांपासून आबालवृध्द सरसावले आहेत. भल्या पहाटे टिकाव, खोरे, पाटी घेऊन लोक डोंगर गाठतात. पाणी फौंडेशनची गावात धूम असून ओढ्याचे खोलीकरण, गाळ काढणे, लोकसंख्येच्या प्रमाणात वृक्षारोपणासाठी खड्डे काढण्यात आले आहेत. डोंगर उतारावरुन वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी (डिप सीसीटी) समतल चर खोदण्याचे काम सुरू आहे. गाव पाणीदार करुन वॉटर कप जिंकायचा या इषेर्ने झपाटलेले ग्रामस्थ गावातील राजकीय मतभेद गटतट बाजूला सारून खांद्याला खांदा लावून पाण्यासाठी राबत आहेत. शेकडो ग्रामस्थ डोंगरावर समतल चर खोदण्याचे काम करीत असल्याने डोंगर माणसांनी गजबजून गेले आहेत. शासनावर अवलंबून न राहता देणगी..पाणी अडवा, पाणी जिरवा मोहिमेत ग्रामस्थांनी ऐक्याची वज्रमूठ आवळली असून श्रमदानाबरोबर लोकवर्गणीतून गाळ काढणे, खोलीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. निधीसाठी शासनावर अवलंबून न राहता सर्व स्तरातून लोकांनी देणगी गोळा करून कामाला वेगाने सुरूवात केली आहे. सहभाग वाढतोय…पाणी फौंडेशनच्या कामाला गती आल्याने गावागावात पाणीदार चळवळ उभी राहिली आहे. या चळवळीला बळ देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधीसुध्दा सरसावले आहेत.अ नेक अधिकारी,पदाधिकारी,शालेस विद्यार्थी या पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेत सहभागी झाली आहे.जत तालुक्यात मोठी नैसर्गिक देणगी लाभली आहे. उत्तर दिशेचा अपवाद वगळता तीन्ही बाजुंनी डोंगर आहे. पावसाचे प्रमाण चांगले असले तरी पाणी अडवले नसल्याने मोठ्या प्रमाणावर वाहून जाते. दरवर्षी तालुक्यातील आंशी टक्के गावाना पाणी
टंचाईचा सामना करावा लागतो. गेल्या चार वर्षांत कूपनलिका खोदून काही जणांनी पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, पाण्याची पातळी खालावल्यामुळे कुपनलिका कोरड्या पडल्या असून पाण्यासाठी घातलेले लाखो रुपये वाया गेले आहेत. पाणीटंचाईमुळे हैराण झालेल्या जतकरांना पाण्याचे महत्त्व समजल्याने गाव व परिसरात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंब न् थेंब जमिनीत मुरवून गाव पाणीदार करण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेला गती देण्याचा निर्णय घेतला.
जत तालुक्यातील सत्यमेव जयंते वॉटर कॅॅप स्पर्धा तिनसाठी आंवढी, बागलवाडी, देवनाळ, नवाळवाडी,बेंळूखी सह सुमारे 106 गावात श्रमदान सुरू आहे.या गावात 8 एप्रिल ते 22 मे पर्यत श्रमदान,व मशिनद्वारे जलसंधाराची कामे केली जात आहेत.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.